जाहिरात

F&O वाल्यांनो इकडे लक्ष द्या, 1 जानेवारीपासून होतोय मोठा बदल

सध्या निफ्टी बँकचे मासिक आणि तिमाही कॉन्ट्रॅक्ट महिन्याच्या अखेरच्या बुधवारी संपतात, फिन निफ्टीसाठी हे कॉन्ट्रॅक्ट मंगळवारी संपतात.

F&O वाल्यांनो इकडे लक्ष द्या, 1 जानेवारीपासून होतोय मोठा बदल
मुंबई:

निफ्टी बँक, फिननिफ्टी, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि निफ्टी नेक्स्ट50 यांचे विकली कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्यानंतर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने सर्व  F&O करारांचा मंथली एक्सपायरीचे दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंथली एक्सपायरी 1 जानेवारीपासून गुरुवारी असेल. सध्या, निफ्टी बँकेचे मासिक आणि त्रैमासिक कॉन्ट्रॅक्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी संपतात, तर फिन निफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट मंगळवार संपतात. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट कॉन्ट्रॅक्ट्स सोमवारी संपतात आणि निफ्टी नेक्स्ट50 कॉन्ट्रॅक्ट्स शुक्रवारी एक्स्पायर होतात. NSE ने सांगितले की, निफ्टीच्या मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक कराराच्या एक्सपायरीच्या दिवसांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हा नियम 01 जानेवारी 2025 पासून लागू होईल.

नक्की वाचा : 7 धमाकेदार Mutual Fund, अवघ्या 5 वर्षांत मिळतोय 5 पटीहून अधिक परतावा

एक्सचेंजने म्हटले आहे की सर्व विद्यमान इंडेक्स डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या सुधारित एक्पपायरी दिवसांचा उल्लेख कॉन्ट्रॅक्ट फाइलमध्येही असेल. या फाईल 1 जानेवारी 2025 रोजी दिवसाच्या शेवटी तयार केल्या जातील.  2 जानेवारी 2025 पासून हे बदल पूर्णपणे अंमलात आलेले असतील.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आठवड्याच्या सुरुवातीला, BSEने सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची मंथली एक्स्पायरी 1 जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.  सेन्सेक्सचे विकली कॉन्ट्रॅक्टदेखील सध्याच्या शुक्रवारच्या मुदतीऐवजी मंगळवारी संपतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com