जाहिरात

BSE News: BSE बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत? 'या' दिवशी होणार मोठा निर्णय

या बैठकीत बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर देण्याचा निर्णय झाला, तर तीन वर्षात गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस मिळणार आहे.

BSE News: BSE बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत? 'या' दिवशी होणार मोठा निर्णय

मुंबई: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या संचालक मंडळाची बैठक 30 मार्च 2025 (रविवार) रोजी होणार आहे. यामध्ये, बोनस शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. 26 मार्च रोजी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. या बैठकीत बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर देण्याचा निर्णय झाला, तर तीन वर्षात गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस मिळणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंजनं येत्या 30 तारखेला गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्यासंदर्भात  बोर्डाची बैठक बोलावली आहे. यासंदर्भात व्यवस्थापनानं सेबीकडे माहिती दिली आहे.  बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर देण्याचा निर्णय झाला, तर तीन वर्षात गुंतवणूकदारांना
दुसऱ्यांदा बोनस मिळणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये एक्सचेंजनं एक शेअरसाठी दोन  शेअर बोनस दिला होता.

गेल्या वर्षभरात बीएसईचा शेअर 94 टक्के वधारलाय. आणि 2017मध्ये लिस्ट झाल्यापासून शेअरची किंमत 15 पट वाढलीय.  बीएसईनं गुंतवणूकदारांना आतापर्यंत २२ वेळा डिव्हिंडटही दिलाय. तर सप्टेंबर 2024मधील डेटानुसार बीएसईकडे जवळपास 2532 कोटी रुपयांची रोकड उपलब्ध आहे. आज 26 मार्च 2025 रोजी दिवस अखेर 3.6 टक्के घसरुन 4 हजार 484 रुपये होती.  बाजार बंद झाल्यावर बोनस विषयीची माहिती प्रसिद्ध झाली. त्यामुळे उद्या
जेव्हा बाजार उघडले तेव्हा शेअरवर या बातमीचा परिणाम होईल अशी शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा काय? उज्वल निकमांनी एक एक गोष्टी सांगितल्या

"आम्ही डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटचा पाठलाग करणार नाही, परंतु दोन्ही एक्सपायरीजमध्ये अंतर असले पाहिजे," असे बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यांनी  सांगितले आहे. बुधवारी, बीएसईचे शेअर्स 3.6% घसरून 4.484  रुपयांवर बंद झाले. हा शेअर ₹ 6,133 च्या त्याच्या शिखर पातळीपेक्षा 27 % खाली व्यवहार करत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: