Post Office Scheme : बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेची मुदत 5 वर्षे आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Post Office Scheme : सध्याच्या स्थितीत अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि फायदेशीर गुंतणुकीच्या शोधात आहेत. अमेरिका आणि चीनमधील ट्रे़ड वॉरमुळे सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र बँक एफडी एवढीच सुरक्षित आणि जास्त व्याज मिळणारी एक योजना पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. एकरकमी गुंतवणूक करुन दरमाह उत्पन्न हवं असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर आहे. निवृत्तीनंतर आपल्याजवळील रक्कम या योजनेत गुंतवली तर एक मासिक उत्पन्नाचा पर्याय तयार होऊ शकतो. 

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमची वैशिष्ट्ये

या योजनेत पैसे गुंतवल्यास त्या रकमेवर दरमहा निश्चित व्याज मिळते. भारत सरकारची ही योजना असल्याने त्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यात एकदाच रक्कम गुंतवायची आहे आणि त्याचा फायदा दरमान गुंतवणूकदारांना मिळणार आहे. 

(नक्की वाचा-  Mobile App : हे 5 सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

योजनेचा कालावधी 

पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेची मुदत 5 वर्षे आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता. तर जॉईंट अकाउंटसाठी ही गुंतवणूक 15 लाख रुपयांपर्यंत आहे.

Advertisement

किती व्याज मिळते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या वार्षिक व्याजदर 7.4 टक्के आहे. म्हणजे जर 9 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर 7.4  टक्के वार्षिक व्याजदरानुसार दरमहा अंदाजे 5,550 रुपये व्याज मिळेल. या व्याजदरातर सरकारकडून बदल केले जातात. 

(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते ट्रान्सफर करण्याची सोय आहे. मुदत पूर्ण होण्याआधी तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता, मात्र त्यासाठी काही दंड भरावा लागतो. या योजनेत मिळणारे व्याज करपात्र आहे. गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळत नाही.

Advertisement