
Government App : मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि सोईनुसार अनेक अॅप्स असतात. त्यातील अनेक अॅप्स कामाचे तर अनेक अॅप्स बिनकामाचे असतात. मात्र असे काही सरकारी अॅप्स आहेत जे रोजच्या जगण्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे हे अॅप्स मोबाईलमध्ये असले तर तुमची वेळ आणि पैसे दोन्ही वाचण्यास मदत होईल. सरकारचे ते कोणते अॅप्स आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
RBI Direct App
आरबीआय डायरेक्ट अॅपद्वारे तुम्ही सरकारी रोखे, सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड, ट्रेझरी बिल्स आणि फ्लोटिंग रेट बचत बॉण्ड्समध्ये थेट गुंतवणूक करु शकता. या ॲपमुळे सामान्य नागरिक ब्रोकरशिवाय म्युच्युअल फंड, सरकारी बॉण्ड्स खरेदी आणि विक्री करू शकतात. यामधून गुंतवणूक केल्यास फिक्स्ड डिपॉझिटपेक्षाही जास्त रिटर्न मिळते. तसेत सरकारी अॅप आहे म्हणून सुरक्षित देखील आहे.
M Parivahan App
एम परिवहन हे ॲप नागरिकांना परिवहन विभागाशी संबंधित विविध माहिती, सेवा आणि सुविधा त्यांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देते. एम परिवहन अॅपद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बूक, पीयूसी असे गाडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे यात स्टोअर करुन ठेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला सर्वांची फिसिकल कॉपी सोबत ठेवण्याची गरज लागणार नाही. पोलिसांना एम परिवहन अॅपमधील कागदपत्रे दाखवून तुम्ही दंड टाळू शकता. याशिवाय कोणत्याही वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्या वाहनाच्या मालकाचे नाव, नोंदणीची तारीख, मॉडेल, इंजिन नंबर, चेसिस नंबर, विमा वैधता, फिटनेस वैधता आणि पीयूसीची माहिती मिळते.
(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
Digi Locker
डीजी लॉकर अॅपचा उद्देश नागरिकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी एक क्लाउड-आधारित स्टोरेज स्पेस उपलब्ध करून देणे आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, मार्कशीट असे विविध कागदपत्रे इथेच स्टोअर केले जाऊ शकतात. तसेच आपले महत्त्वाचे कागदपत्रे कधीही आणि कोठूनही ॲक्सेस करण्याची सोय मिळते. डीजी लॉकरमधील डिजिटल डॉक्युमेंट्सना मूळ कागदपत्रांइतकीच कायदेशीर मान्यता आहे.
Digi Yatra
डिजी यात्रा हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेले एक डिजिटल इनिशिएटिव्ह अॅप आहे. विमान प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ, जलद आणि पेपरलेस करणे या याचा उद्देश आहे. या ॲपद्वारे फेशिअल रिकग्नाझेशन टेक्नोलॉजीचा वापर करून विमानतळावरील विविध चेकपॉईंट्सवर प्रवाशांची ओळख पटवली जाते. ज्यामुळे त्यांना कोणतेही फिजिकल डॉक्युमेंट्स दाखवण्याची गरज भासत नाही. विमानतळावर वेळ वाचवण्यासाठी हे अॅप खूप फायदेशीर आहे.
(नक्की वाचा- जगजेत्ते गुंतवणूकदार वॉरेन बफेंची निवृत्तीची घोषणा! नवे CEOही ठरले, कोण सांभाळणार विशाल साम्राज्य?)
Annual Information Statement - AIS
अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे आयकर विभागाद्वारे जारी केलेले अॅप आहे. यात करदात्यांना आर्थिक वर्षातील सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती असते. करदात्यांना त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची एकाच ठिकाणी माहिती मिळते. जर AIS मध्ये कोणतीही चुकीची माहिती असेल, तर करदाता त्याबद्दल ऑनलाइन फीडबॅक देऊ शकतात. सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने आयकर रिटर्न भरणे सोपे होते. ज्यामुळे कर प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता येते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world