Repo Rate : 50 लाखांचं गृहकर्ज, महिन्याला 781 वाचतील; SIP मध्ये टाकाल तर 7 लाख होतील जमा, गणित समजून घ्या

गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केल्याने ५० लाखांचं २० वर्षांसाठी घेतलेल्या लोनमध्ये ७८१ रुपये कमी होतील.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय घट केली आहे. ५ डिसेंबर रोजी दास यांनी वर्षातील एक महत्त्वाची भेट दिली आहे. गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केल्याने कर्जदाराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. या कपातीमुळे घर आणि वाहन घेणाऱ्यांचे स्वप्न आता आणखी परवडणारं होणार आहेत. या निर्णयाचा एखाद्या व्यक्तीवर किती परिणाम होईल हे एका साध्या गणितावरून स्पष्टपणे दिसून येते.

रिझर्व्ह बँकेने या वर्षी तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. ज्यामुळे कर्जाचे व्याजदर १.२५% पर्यंत खाली आले आहेत. ही घर आणि वाहन खरेदीदारांसाठी निश्चितच चांगली बातमी आहे.

नक्की वाचा - Home Loan तुमच्या होम लोन आणि कार लोनचा EMI किती कमी होणार? RBI च्या निर्णयाचा कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

Advertisement

५० लाखांच्या लोनवर किती ईएमआय?

एखाद्या व्यक्तीने घर खरेदी करण्यासाठी ५० लाखांचं होम लोन २० वर्षांसाठी घेतलं. त्याला ८.२५ टक्के व्याज द्यावं लागतं. यावर ४२,६०३ रुपयांचा EMI द्यावा लागत असेल. याचा अर्थ संपूर्ण कालावधीत तुम्हाला व्याजाच्या रुपात ५२,२४७८८ रुपये द्यावे लागतील. तुम्हाला एकूण १,०२,२४,७८८ रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ तुम्ही जितकं लोन घेतलं होतं, त्याहून अधिक व्याजाच्या रुपात द्यावं लागेल.

किती पैसे वाचणार?

गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केल्याने ५० लाखांचं २० वर्षांसाठी घेतलेल्या लोनमध्ये ७८१ रुपये कमी होतील. याचा अर्थ दरवर्षी तुम्हाला EMI च्या रुपात ९,३७२ रुपयांची बचत होईल. याचा अर्थ २० वर्षांच्या कालावधीत तुमचे १,८७,४४० रुपये वाचतील. ही रक्कम तुम्ही SIP मध्ये टाकली तर मोठी रक्कम जमा होईल.

Advertisement