- रिजर्व बैंक ने रेपो रेट में 0.25 फीसदी की कटौती कर होम, ऑटो और पर्सनल लोन की ईएमआई में कमी का रास्ता साफ किया
- रेपो रेट घटने से बैंकों को सस्ता कर्ज मिलता है जिससे वे ग्राहकों को ब्याज दरों में कमी प्रदान करते हैं
- इस साल RBI ने कुल 100 बेसिस प्वाइंट की ब्याज दरों में कमी की है लेकिन बैंकों ने पूरा लाभ नहीं दिया है
रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करून, होम लोन, ऑटो लोन (कार लोन) आणि पर्सनल लोनच्या मोठ्या हप्त्यांचा भार सहन करणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे. या कपातीमुळे तुमच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) थेट घट होणार आहे. तीन दिवसांच्या मौद्रिक धोरण आढावा बैठकीनंतर RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
रेपो रेट कपातीचा तुमच्या EMI वर किती परिणाम होईल?
RBI च्या या निर्णयामुळे तुमच्या कर्जाच्या मासिक हप्त्यात (EMI) किती घट होऊ शकते, याचा एक अंदाजित हिशोब खालीलप्रमाणे आहे
20 लाख रुपयांच्या होम लोनवर : तुम्ही 20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, तर तुमच्या मासिक हप्त्यामध्ये (EMI) 310 रुपये पर्यंत घट होऊ शकते.
30 लाख रुपयांच्या होम लोनवर: त्याचप्रमाणे, 30 लाख रुपयांच्या कर्जावर तुमचा मासिक हप्ता सुमारे 465 रुपयापर्यंत कमी होऊ शकतो.
या कपातीचा सर्वाधिक फायदा फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्या सध्याच्या ग्राहकांना तसेच नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.
| लोनची रक्कम | कालावधी | लोन रेट | EMI | एकूण व्याज | व्याजासह एकूण रकम |
| 20 लाख | 20 वर्ष | 8 टक्के | 16730 | 20.15 लाख | 40.15 लाख |
| 20 लाख | 20 वर्ष | 7.75 टक्के | 16420 | 19.40 लाख | 39.40 लाख |
| किती फायदा | 20 वर्ष | -- | 310 रुपये | 74000 रुपये | 74000 रुपये |
रेपो रेट म्हणजे काय आणि त्याचा थेट फायदा कसा होतो?
रेपो रेट हा असा व्याज दर आहे, ज्या दराने रिझर्व्ह बँक (RBI) देशातील इतर व्यावसायिक बँकांना कर्ज देते. रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना RBI कडून स्वस्त दरात कर्ज मिळते.
यामुळे बँकांचा खर्च कमी होतो आणि ते ग्राहक-आधारित कर्जाचे दर (जसे की होम लोन, कार लोन) देखील कमी करण्याचा विचार करतात.परिणामी, ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदर कमी होतात आणि त्यांचा मासिक हप्ता (EMI) कमी होतो.
( नक्की वाचा : 8th Pay Commission: लॉटरी लागली! 'फिटमेंट फॅक्टर'नुसार पगार दुप्पट होणार? तुमचं वेतन किती वाढेल? इथं करा चेक )
| लोनची रक्कम | कालावधी | लोन रेट | EMI | एकूण व्याज | व्याजासह एकूण रक्कम |
| 30 लाख | 20 वर्ष | 8 टक्के | 25090 | 30.22 लाख | 60.22 लाख |
| 30 लाख | 20 वर्ष | 7.75 टक्के | 24630 | 29.10 लाख | 59.10 लाख |
| किती फायदा | 20 वर्ष | ......... | 465 रुपयांपर्यंत | 1.12 लाख | 1.12 लाख |
बँका ग्राहकांना पूर्ण लाभ देणार का?
या वर्षात RBI ने एकूण 125 बेसिस पॉईंट्सची (1.25 टक्के) कपात केली आहे. मात्र, बँकांनी या कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला नाही.
बँका त्यांच्या कर्जाचे दर ठरवण्यासाठी MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) चा आधार घेतात. त्यामुळे, या ताज्या कपातीनंतर बँका MCLR मध्ये किती घट करतात आणि ग्राहकांना किती फायदा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महागाई दरात झालेली घट लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world