Rule Change From 1st December : आज १ डिसेंबर...आजपासून देशात मोठे बदल लागू होणार आहेत. यासोबतच महिन्याच्या सुरुवातीला होम लोन, ऑटो लोन भरणाऱ्या नागरिकांना आनंदाची बातमी मिळू शकते. महागाईमध्ये घट झाल्यामुळे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) त्यांच्या पुढील चलनविषयक धोरण बैठकीत (MPC) रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करू शकतं. असं झाल्यास Loan EMI देखील कमी होतील.
५ डिसेंबरला होणार मोठी घोषणा
आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक येत्या ३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि यामध्ये रेपो रेटसह अन्य मुद्द्यांवर घेतलेल्या निर्णयांची घोषणा ५ डिसेंबर म्हणजे शुक्रवारी केलं जाईल. आरबीआय गर्व्हनर संजय मल्होत्रा रेट-सेटिंग पॅनलच्या निर्णयाची घोषणा ५ डिसेंबरला सकाळी १० वाजता करतील.
नक्की वाचा- SIP Investment: फक्त 7.68 लाखांची गुंतवणूक, नफा 92 लाखांचा! जाणून घ्या त्या मागचे सोपे गणित
रेपो रेट किती असेल?
सेंट्र्ल बँकेने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपला रेट-इजिंग सायकल सुरू केली होती. ऑगस्ट महिन्यात रेपो दर कपात थांबवण्यापूर्वी मध्यवर्ती बँकेने पॉलिसी घोषणांमध्ये रेपो दरात एकूण १०० बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. सध्या रेपो रेट ५.५ टक्के आहे. काही तज्ज्ञांनुसार, आरबीआय आपल्या येणाऱ्या मॉनेटरी पॉलिसी बैठकीत बेंचमार्क लेडिंग रेटमध्ये २५ बीपीएसची आणखी कपात करू शकतो. जर अशी काही घोषणा झाली तर रेपो रेटमध्ये कपात होऊन ५.२५ पर्यंत घट होईल. लोन घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.
व्याजदर ०.२५ टक्के कमी झाल्यास कर्जदारांचे किती पैसे वाचतील?
एका व्यक्तीने २० वर्षांसाठी २० लाखांचं कर्ज घेतलंय. यावर व्याजदर ८ टक्के व्याज असून दरमाह हफ्ता १६,६२९ इतका आहे. यासाठी एकूण व्याज २०.१४ लाख आणि शेवटी ४०.१४ लाख इतकी रक्कम भरावी लागतेय. जर व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी झाल्यास, ७.७५ टक्के व्याजदरासाठी ईएमआयमधील दरमाह ३१० रुपये कमी होतील. यामुळे २० वर्षांचा एकूण व्याजदर ६४ हजारांनी कमी होईल.