जाहिरात

SIP Investment: फक्त 7.68 लाखांची गुंतवणूक, नफा 92 लाखांचा! जाणून घ्या त्या मागचे सोपे गणित

मात्र गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा नक्कीच सल्ला घ्या. सल्ल्यानंतरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या.

SIP Investment: फक्त 7.68 लाखांची गुंतवणूक, नफा 92 लाखांचा! जाणून घ्या त्या मागचे सोपे गणित
मुंबई:

SIP Benefits: गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात अस्थिरता कायम असल्याचं दिसून येत आहे. या चढ-उतारांमुळे निर्माण झालेल्या भीतीवर मात करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक प्रभावी आणि सोपा मार्ग ठरत आहे. SIP च्या माध्यमातून दर महिन्याला एक छोटी रक्कम गुंतवून कोणताही सामान्य गुंतवणूकदार दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. त्यात त्याच मोठा फायदा होताना दिसत असल्याचं जाणकार सांगत आहेत. सध्याच्या स्थितीत दरमहा फक्त 2000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करोडपती कसे बनता येईल याचे गणित आपण समजून घेवूयात. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

SIP मध्ये चक्रवाढ व्याजाची (Compounding) ताकद प्रभावीपणे काम करते. हे आतापर्यंत दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही 2000 रुपयांची मासिक SIP चांगल्या म्युच्युअल फंडात नियमितपणे चालू ठेवता. शिवाय ती  दीर्घकाळात सरासरी 12% वार्षिक परतावा मिळते, तेव्हा खालीलप्रमाणे फंड तयार होतो. तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर वार्षिक सरासरी बारटक्के परतावा मिळतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यातून अनेक गुंतवणूकदारांना फायदा ही झालेला दिसतो. जर त्याच प्रमाणे गुंतवणूक केली तर पुढील प्रमाणे परतावा मिळू शकतो. 

  • 10 वर्षे: अंदाजित मूल्य ₹4.65 लाख
  • 20 वर्षे: अंदाजित मूल्य ₹19.96 लाख
  • 32 वर्षे: अंदाजित मूल्य ₹1.02 कोटी

फक्त 7.68 लाखांची गुंतवणूक, नफा 92 लाखांचा!
तुम्ही 32 वर्षांसाठी दरमहा 2000 रुपये गुंतवल्यास तुमची एकूण गुंतवणूक फक्त 7.68 लाख रुपये होते. पण कंपाऊंडिंगमुळे त्याचे मूल्य 1.02 कोटींहून अधिक होते. म्हणजेच गुंतवणूकदाराला तब्बल 92 लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतो. SIP चा मुख्य फायदा हाच आहे की कमी रकमेपासून सुरुवात करून शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास मोठा फंड तयार होतो. मात्र गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा नक्कीच सल्ला घ्या. सल्ल्यानंतरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या. 

नक्की वाचा - Government Holiday: 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर, किती सुट्ट्या झाल्या कमी? पाहा संपूर्ण लिस्ट

Listen to the latest songs, only on JioSaavn.com