RBI ने 11 व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. RBI च्या MPC ने 6.5 टक्के वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाचा आढावा जाहीर केला.
दुसऱ्या तिमाहीत जीडीपीच्या वाढीत झालेली घसरण आणि महागाई तसेच इतर आव्हाने पाहता रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच रेपो रेट 6.5 टक्क्यांवर वर कायम आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 4, 5 आणि 6 डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत एमपीसीने पतधोरण दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय बहुमताने घेतला आहे.
शक्तीकांत दास यांनी म्हटलं की, ऑक्टोबर महिन्यातील महागाईचा दर वरच्या मर्यादेच्या पुढे गेला आहे. अन्नधान्य चलनवाढ तिसऱ्या तिमाहीत उच्च राहण्याची आणि चौथ्या तिमाहीत घट होण्याची शक्यता आहे. उच्च महागाई दरामुळे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा कमी होतो, ज्यामुळे खाजगी वापरावर परिणाम होतो.
वाढलेला महागाईचा दर आणि घसरलेला विकासाचा दर अशा कात्रीत अर्थव्यवस्था सापडलेली आहे. त्यामुळे रेपो दरात बदल होईल अशी चर्चा सुरु होता. सध्याच्या परिस्थितीत थेट व्याजदरात बदल करणे किंवा रेपो दरात कपात करणे तितकेसे योग्य नाही हे रिझर्व बँकेकडून मागच्या पदावरून आढळणाऱ्या स्पष्ट करण्यात आले होते.