भारतीय स्टेट बँकेने (SBI) ३० नोव्हेंबर २०२५ पासून एक महत्त्वपूर्ण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्राहक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. ऑनलाइन एसबीआय आणि योनो लाइटवर mcash पाठवणे आणि दावा करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. याचा अर्थ ग्राहक यापुढे लाभार्थी रजिस्ट्रेशनशिवाय पैसे पाठविण्याची सेवा बंद झाल्यानंतर mCash लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून पैसे क्लेम करण्यासाठी mCash चा वापर करू शकणार नाहीत.
आपल्या अधिकृत वेबसाइटवर केलेल्या पोस्टमध्ये एसबीआयने आपल्या ग्राहकांना थर्ड पार्टी लाभार्थ्यांना पैसे पाठविण्यासाठी युपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस सारख्या इतर सुरक्षित आणि व्यापकपणे वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करण्याची विनंती केली आहे.
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ३० नोव्हेंबर २०२५ नंतर ऑनलाइन एसबीआय आणि योनो लाइटमध्ये mCash चा वापर करू शकणार नाहीत. थर्ज पार्टी लाभार्थ्यांना पैसे पाठविण्यासाठी UPI, IMPS, NEFT, RTGS या पर्यायांचा वापर करावा लागेल.
mCash चा वापर कसा केला जात होता?
गुगल प्ले स्टोअरवरुन एसबीआय एमकॅश अॅप डाऊनलोड केल्यानंतर लॉगइन करण्यासाठी तुमचा एमपिन नोंदणी केली जाते. ग्राहक हा एमपिन वापरून एसबीआय एमकॅश अॅपमध्ये लॉग इन करू शकतात. स्टेट बँकेचे ग्राहक पासकोड वापरून एमकॅश वापरुन दाव्याची रक्कम ट्रान्सफर करू शकतात. ही रक्कम कोणत्याही बँक खात्यात पाठवली जाऊ शकते.
नक्की वाचा - Financial News: धक्कादायक! देशातील शहरी नागरिकांमध्ये 5 पैकी 2 व्यक्तींकडेच चार महिन्यांचा आपातकालीन निधी
एमकॅश कसं काम करतं?
स्टेट बँक ऑफ इंडिया एमकॅश वापरकर्त्यांना एसबीआय ग्राहकांनी ऑनलाइन एसबीआय किंवा स्टेट बँक अॅनिव्हेयरद्वारे पाठवलेले पैसे मागण्याची परवागी मिळते. या सेवेद्वारे इंटरनेट बँकिगचा वापर करीत असलेला एसबीआय ग्राहक केवळ मोबाइल नंबर किंवा इमेल आयडी वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतो.
UPI mCash वापरून पैसे कसे पाठवावे?
ग्राहक पैसे पाठविण्यासाठी आणि मिळविण्यासाठी एसबीआय युपीआय वापरू शकता. भीम एसबीआय पे हे एक पेमेंट सॉल्यूशन आहे. जे सर्व युपीआय सहभागी बँकांच्या खातेधारकांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून पैसे पाठवू शकतात आणि मिळवूही शकतात. यातून तुम्ही ऑनलाइन बिल पेमेंट, रिचार्ज आणि शॉपिंग इत्यादी गोष्टी करू शकता.
पैसे कसे ट्रान्सफर केले जातील?
प्रथम, BHIM SBI Pay अॅपमध्ये लॉग इन करा. 'पे' पर्याय निवडा आणि VPA किंवा खाते, IFSC किंवा QR कोड सारखा कोणताही पेमेंट निवडा. इतर आवश्यक गोष्टी अॅड करा. लिंक केलेल्या खात्यांमधून डेबिट खाते निवडा आणि टिक चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर व्यवहार अधिकृत करण्यासाठी युपीआय पिन घाला. पेमेंट पूर्ण करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
