Financial Preparedness: भारतातील शहरी आणि निमशहरी नागरिकांची आर्थिक सज्जता आणि नियोजनाबद्दलच्या धारणा तपासणारा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एचडीएफसी लाईफच्या 'रेडी फॉर लाईफ' या नवीन संशोधन-आधारित अहवालाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
10 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या या अहवालातून, भारतीयांच्या आर्थिक नियोजनातील मोठी तफावत दिसून आली आहे. विमा साक्षरता आणि दीर्घकालीन संरक्षणाची गरज यातून अधोरेखित होते. आर्थिक सज्जतेच्या बाबतीत शहरी आणि निमशहरी लोकसंख्येच्या मानसिकतेत फारसा फरक नसल्याचे अहवालातून पुढे आले आहे.
(नक्की वाचा- Tata Group News : पुण्याच्या किर्लोस्करांचा जावई होणार रतन टाटांचा उत्तराधिकारी? TATA घराण्यात मोठा फेरबदल)
आपत्कालीनी निधी नाही
सोप्या शब्दात सांगायचे तर, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी शहरी नागरिकांकडे पुरेसा निधी नाही. सर्वेक्षणानुसार, पाचपैकी केवळ दोनच व्यक्तींकडे चार महिने पुरेल इतका आपत्कालीन निधी जमा आहे. निवृत्तीसाठी नियोजन केलेले असतानाही, तीनपैकी दोन व्यक्तींना निवृत्तीनंतर कुटुंबाकडून आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
कसा झालं सर्वेक्षण?
10 नोव्हेंबरला HDFC LIFE ने हा अहवाल जाहीर केला. अहवालासाठी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, धुळे या शहरांव्यतिरिक्त दिल्ली, चेन्नई, कोलकाता, लखनौ, जोधपूर, कोची, विशाखापट्टणम, वडोदरा, भुवनेश्वर, पटणा, मुझफ्फरनगर, पानिपत, तंजावर, मछलीपट्टणम, आनंद, वर्धमान, गंजम याशहरातील सुमारे 1800 हून अधिक लोकांशी थेट संपर्क करण्यात आला. भारतातील शहारी नागरिकांचा ‘फायनान्शिअल रेडीनेस' तपासणे हा सर्वेक्षणाचा मूळ हेतू होता.
प्रादेशिक आणि शहराच्या श्रेणीनुसार हे संशोधन भारतातील व्यक्तींमधील आर्थिक सुसज्जतेमधील उल्लेखनीय प्रादेशिक फरक निदर्शनास आणते.
• उत्तर भारतात मुख्यतः कमकुवत आपत्कालीन आणि निवृत्ती नियोजनामुळे सुसज्जतेमधील तफावत 30 पॉइण्ट्ससह सर्वात जास्त आहे.
• पूर्व भारतात 20 पॉइण्ट्सच्या तफावतीसह सर्वात वास्तववादी स्व-मूल्यांकन निदर्शनास आले आहे आणि पारंपारिक व शिस्तबद्ध बचत दृष्टिकोन देखील दिसून येतो.
• आर्थिक आणि आरोग्य नियोजनाच्या बाबतीत दक्षिण भारत परिपक्वतेत आघाडीवर आहे.
• पश्चिम भारतात गुंतवणूकीचा दृष्टिकोन अधिक वैविध्यपूर्ण आहे, पण दीर्घकालीन नियोजनावर कमी लक्ष केंद्रित केले आहे. •
• तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये सुसज्जतेमधील तफावत सर्वात कमी आहे आणि आत्मविश्वासातील तफावत सर्वात जास्त आहे, ज्यामधून महानगरांच्या पलीकडे सखोल आर्थिक साक्षरता प्रयत्नांची आवश्यकता दिसून येते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world