
SBI Job Opening: सरकारी बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) ने 'स्पेशलिस्ट ऑफिसर' (SO) च्या एकूण 122 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,05,280 पर्यंत मासिक पगार मिळू शकते. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भरती व्यवस्थापक (Manager) आणि उपव्यवस्थापक (Deputy Manager) पदांसाठी आहे.
पदे आणि शैक्षणिक पात्रता:
व्यवस्थापक/ मॅनेजर (क्रेडिट ॲनालिस्ट) - 63 पदे:
या पदासाठी, उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून पदवीसह MBA (Finance), PGDBA, PGDBM, MMS (Finance), CA, CFA किंवा ICWA यापैकी एक पदवी असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ही पदवी आहे अशा उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. मॅनेजर पदासाठी जवळपास 63 पदे भरली जाणार आहेत. एसबीआय सारख्या बँकेत या पदावर काम करण्याची संधी या भरतीच्या माध्यमातून मिळणार आहे.
व्यवस्थापक/उपव्यवस्थापक (प्रोडक्ट्स-डिजिटल प्लॅटफॉर्म्स):
यासाठी एकूण 59 पदे आहेत. तेवढी पदे भरली जाणार आहेत. यापदासाठी उमेदवाराकडे BE/BEET (IT, Computer, Electronics, Electrical इ.) किंवा MCA ची पदवी असणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे संबंधीत शैक्षणीक पात्रता आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यांनी या पदासाठी अर्ज करावा असे एसबीआयने आवाहन केले आहे.
वेतन आणि वयोमर्यादा:
व्यवस्थापक पदांसाठी वेतन 85,920 ते 1,05,280 रुपये पर्यंत असू शकते. तर उपव्यवस्थापक पदांसाठी 64,820 ते 93,960 रुपये पर्यंत मूळ वेतन मिळेल. वयोमर्यादेनुसार, व्यवस्थापक पदांसाठी 28 ते 35 वर्षे, उपव्यवस्थापक पदांसाठी 25 ते 32 वर्षे आणि व्यवस्थापक (क्रेडिट ॲनालिस्ट) पदांसाठी 25 ते 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या वयाच्या व्यक्तींनाचा या पदासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया:
सामान्य, EWUS आणि OBC प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते विनामूल्य आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय ज्या शंका असतील त्यांचे निरसन ही होण्यास मदत होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world