जाहिरात

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना महागाईतून मिळणार दिलासा! SBI चा अंदाज

Petrol-Deisel Price: कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम भारताच्या किरकोळ महागाई दरावर होईल.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना महागाईतून मिळणार दिलासा! SBI चा अंदाज

Petrol Deisel Price: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ताज्या अहवालानुसार, येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा भारतातील महागाई कमी होण्यासाठी आणि पेट्रोल-डीझेलचे दर स्वस्त होण्यासाठी होऊ शकतो.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींबाबत 'भारतीय स्टेट बँक' (SBI) ने एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जून 2026 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 50 अमेरिकन डॉलरपर्यंत घसरू शकतात. अमेरिकन ऊर्जा माहिती प्रशासनाने देखील 2026 च्या पहिल्या तिमाहीत ब्रेंट क्रूड 55 डॉलरपर्यंत खाली येण्याचे संकेत दिले आहेत.

भारतीय क्रूड बास्केटवर होणार परिणाम

जागतिक ब्रेंट क्रूड आणि भारतीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 0.98 इतका उच्च सहसंबंध आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर किमती कमी झाल्या की भारतातही त्याचे पडसाद लगेच उमटतात. भारतीय क्रूड सध्या 62.20 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. तांत्रिक विश्लेषणांनुसार येत्या काळात भारतीय क्रूड बास्केटची किंमत 53.31 डॉलर पर्यंत खाली येऊ शकते.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

पेट्रोल-डीझेल स्वस्त होणार?

भारतात सध्या 'डायनॅमिक प्राइसिंग' व्यवस्था लागू आहे, ज्यानुसार इंधनाचे दर दररोज बदलू शकतात. अहवालात असे म्हटले आहे की, जर कच्च्या तेलाच्या किमतीत 14% घसरण झाली, तर त्याचा थेट फायदा पेट्रोल आणि डीझेलच्या किरकोळ किमती कमी होण्यात दिसून येईल. यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

महागाईचा दर घटणार

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम भारताच्या किरकोळ महागाई दरावर होईल. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईवर सुमारे 22 आधार अंकांचा सकारात्मक दबाव पडेल. आर्थिक वर्ष 2027 मध्ये सरासरी किरकोळ महागाई दर 3.4% च्या खाली येण्याची शक्यता आहे.

मुव्हिंग एव्हरेज विश्लेषणानुसार, भारतीय क्रूडच्या किमती सध्या 50-दिवसीय आणि 200-दिवसीय मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेंड करत आहेत. हा एक मंदीचा संकेत असून, आगामी महिन्यांत किमतीत आणखी कमजोरी येण्याची शक्यता यातून अधोरेखित होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com