SEBI ने रवींद्र भारती एज्युकेशन इंस्टिट्युटआणि YouTuber रवींद्र बाळू भारती यांच्या YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे. विनानोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय चालवल्याचा ठपका ठेवत नियामक मंडळाने या दोघांवर कारवाई केली आहे.
SEBI ने त्यांना 4 एप्रिल 2025 पर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे. यासोबतच त्यांना 9.50 कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेबीने ही रक्कम बेकायदेशीर कामांतून कमावल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेबीने या प्रकरणाचा तपास केला आणि असे आढळून आले की रवींद्र भारती यांच्या कंपनीने अनुभव नसलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्ला, शेअरच्या शिफारसी असे अनेक आमिष दाखवले. भारती यांच्या मराठी आणि हिंदी अशा दोन यूट्यूब चॅनेलवर 19 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. जोखीमीच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ते त्यांच्या फॉलोअर्सना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप सेबीने त्यांच्यावर लावला आहे.
(नक्की वाचा - 3000 रुपयांची पनीर मखनी? मुंबईतील तारांकित हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर व्हायरल)
कंपनीने 'हाय रिटर्न्स'चे मार्केटिंग देखील केले. यासोबतच त्यांनी गुंतवणूकदारांना विविध गुंतवणूक योजना विकण्यासारख्या योजना आणि हेराफेरीचा मार्ग वापरला. भारती यांच्या कंपनीने सिक्युरिटीजच्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे सेबीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(नक्की वाचा - YouTube वर खोडसाळ थंबनेल आणि हेडिंग देणाऱ्या Video ची आता खैर नाही!)
कोण आहेत रविंद्र भारती?
रविंद्र भारती मराठी आणि हिंदीत असे दोन यूट्युब चॅनल चालवतात. दोन्ही चॅनलवर त्यांचे अनुक्रमे 10.8 लाख आणि 8.33 लाख असे 20 लाख फॉलोअर्स आहे. त्यांची एक अॅडव्हायझरी फर्म देखील आहे. रविंद्र भारती आणि त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी 2016 मध्ये रविंद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्युट सुरु केलं होते. त्यांची कंपनी स्टॉक मार्केट ट्रेडिंगसंबंधीत शिक्षण देते. त्यांची ही संस्था नोंदणीकृत नव्हती, तरी देखील शेअर बाजाराचं शिक्षण देत होती.