Stock Market Crash: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात तीव्र स्वरुपात दिसला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजार लाल निशानमध्ये उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे 800 अंकांची मोठी घसरण झाली, तर निफ्टीही 200 अंकांनी खाली येऊन लाल निशानात पोहोचला. शेअर बाजारात ही घसरण सलग 5 व्या दिवशी दिसून आली आहे. सकाळी झालेल्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 786.36 अंकांनी किंवा 0.97 टक्क्यांनी घसरून 80,695.50 वर पोहोचला होता, तर निफ्टी 212.80 अंकांनी किंवा 0.86 टक्क्यांनी घसरून 24,642.25 वर आला होता.
( नक्की वाचा: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच )
शेअर बाजारात घसरणीची कारणे
शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय प्रमुख मानला जात आहे. ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, भारताने रशियाकडून ऊर्जा खरेदी केल्याबद्दल अमेरिकेकडून स्वतंत्र दंड लावला जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. या घोषणेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.
( नक्की वाचा: बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे )
गुंतवणूकदारांना मोठा फटका
गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. या काळात सेन्सेक्समध्ये 2100 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे, म्हणजेच सुमारे 3 टक्के घट नोंदवली गेली आहे. तर निफ्टी सुमारे 2.5 टक्के घसरला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 13 लाख कोटींनी घटले आहे. 23 जुलै रोजी बीएसईचे मार्केट कॅप 460.35 लाख कोटी होते, जे 29 जुलै रोजीघसरून 447 लाख कोटी रुपयांवर आले आहे.