Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?

Share Market Investment Tips: जार सोमवारी प्रतीकात्मक प्रतिक्रिया देईल ऑपशन ट्रेडिंग किंवा फ्युचर वायदे बाजारात समभाग खरेदी करण्याचा मोह टाळावा. गुंतवणूक हाच सध्याचा पर्याय बाजारासाठी योग्य ठरेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

केदार ओक, गुंतवणूक सल्लागार:

आठवड्याच्या सुरवातीला बाजार जी दिशा दाखवतो  बरोबर त्याच्या उलटी दिशा पुढील दिवसात  बाजारात दिसून येते आणि त्याचा अनुभव पुन्हा एकदा मागील आठवड्यात  गुंतवणूकदारांना आला. सोमवारी खाली घसरलेला निर्देशांक पुन्हा एकदा तेजी दाखवून गेला. तसं मोठं असं काही घडलं नसताना शुक्रवारी मोठी तेजी निर्देशांकात दिसून आली आणि मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ८२४०८(+१०४६)/२५११२ (+३१९) असा बंद झाला.या तेजीमुळे संरक्षण/सेवा क्षेत्र /सॉफ्टवेअर यांच्यात रिकव्हरी दिसून आल्याचे सांगत नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदार ओक यांनी भविष्यातील गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 कालच जाहीर झालेले कर संकलन सांख्यिकी ,त्यात संकलनात दिसून येणारी मर्यादित वाढ, कर परतावाची टक्केवारी ,तिमाही ते तिमाही किंवा मागील आणि पुढील वर्षाचे व्यावसायिक उत्पन्न ,उद्योग विश्वाची  तसं म्हंटलं तर निराशाजनक कामगिरी,जागतिक  पटलावरील अनिश्चितता याच प्रतिबिंब गेल्या काळात बाजारात येऊन गेलेले आहे. त्यामुळे  पुढील काळातील आव्हाहनाचा विचार करिता आणि  सध्याच्या बाजाराचा पातळीचा विचार करता एक नवा तेजीचा कल बाजारात दिसून येत आहे.त्यामुळे सर्वोच्च पातळी  सेन्सेक्स (८५९७८) आणि निफ्टी (२६२७७) या वेळी पार करील अशी शक्यता वाटते.साहजिकच गुंतवणूकदार विचार करतील की एवढी अनिश्चितता असताना तेजी बद्दल कसे बोलले जाते.पण त्याचे उत्तर आपल्या आर्थिक संरचनेत दडले आहे. ज्या सकारात्मक नोंदी आहेत त्या आहेत.

NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?

1.सरकारचे consumption (वापर ) दिलेला भर 
2.कर्जावरील व्याजदर कपात 
3.आटोक्यात असलेला महागाईचा दर
4.GDP (राष्ट्रीय सकल उत्पन्नात असलेले सातत्य )
5. कमी राहिलेल्या कच्च्या तेलाच्या किमती 
6. परकीय गंगाजळी चांगली 
7 .डॉलरच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात कमी घसरणारा रुपया 
गुंतवणूकदारांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ज्या ज्या क्षेत्रात योग्य करेक्शन झाले आहे ,जी नवीन क्षेत्र बाजारात आली आहेत किंवा पुढील काळात IPO मार्फत जी नवीन क्षेत्र बाजारात उदयास येत आहेत  आणि जी पारंपरिक क्षेत्र आहे त्यात गुंतवणुकीस तयार व्हावे, आपल्या सल्लागाराची मदत घेऊन त्यात गुंतवणूक करावी. त्या गुंतवणुकीस काही कालावधी दयावा बाजार ATM नाही हे लक्षात घ्यावे  .
आठवड्याच्या अखेरीस ज्या काही बातम्या येत आहेत त्यावरून बाजार सोमवारी प्रतीकात्मक प्रतिक्रिया देईल ऑपशन ट्रेडिंग किंवा फ्युचर वायदे बाजारात समभाग खरेदी करण्याचा मोह टाळावा. गुंतवणूक हाच सध्याचा पर्याय बाजारासाठी योग्य ठरेल.

Advertisement

बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय

Topics mentioned in this article