
How to Make Money: जर तुम्ही नोकरदार असाल आणि घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नोकरीच्या सुरुवातीला तातडीने घरात गुंतवणूक करायला हवी का? कारण गृहकर्जासाठी 15-20 वर्षे दरमाह मोठी रक्कम भरावी लागते. अशावेळी असंही वाटतं की त्याच पैशांची गुंतवणूक केली तर अधिक पैसे जमा होतील. (Home loan or investment)
घराचा मालक असणं हे वैयक्तित आनंदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचं मानलं जातं. स्वत:चं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र या गृहकर्जात आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येते. 20 वर्षांच्या काळात 40,000 ईएमआय म्हणजे कमी लिक्विडिटी, सीमित गुंतवणूक आणि नोकरी बदलणे किंवा नोकरीवरुन काढून टाकण्याच्या विचारामुळे निर्माण होणारी असुरक्षितता. करिअरच्या सुरुवातीला तरुणाई आर्थिक जबाबदारीत अडकून पडतात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, घर ही एक भौतिक संपत्ती असू शकते. परंतु गृह कर्ज तुमच्या हातात दरमहिन्याला येणाऱ्या पैशांवर मर्यादा आणते. तुम्ही घरमालक असाल, परंतू याच घरात राहत असताना तुम्हाला पैशांची कमतरता असल्याचं जाणवत राहतं. तुम्ही अधिकांश वेळी आर्थिक दबावाखाली असता.
नक्की वाचा - Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?
गुंतवणूक करता तेव्हा काय होतं?
जर हे 40,000 हजार रुपये दरमहा म्युच्युअल फंड, एसआयपी किंवा पीपीएफमध्ये गुंतवले तर काय होईल. सरासरी 10-12% परतावा मिळाल्यास, अशा गुंतवणुकी 10-15 वर्षांत लक्षणीय वाढू मिळू शकते. ज्यामुळे एक मोठा पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही 10 ते 15 वर्षांत इतके पैसे जमा करू शकता की तुम्ही कर्जाशिवाय घर खरेदी करू शकता.
याशिवाय तुमच्या हातात पैसे राहील. यामुळे नोकरी बदलणे, नवीन शहरात शिफ्ट होणं आणि नव्या संधी शोधण्याचं स्वातंत्र्य मिळेल. यावेळी कुठलाही आर्थिक ताण राहणार नाही. याशिवाय तुम्हाला अचानक गरीब झाल्याचा अनुभवही घ्यावा लागणार नाही.
संपत्ती खरेदी कराल की पैसे कमवाल?
करिअरच्या सुरुवातील घर खरेदी करण्याऐवजी पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. करिअरच्या सुरुवातीला घराचा मालक होणं तुम्हाला काही काळासाठी भावनिकदृष्ट्या आनंद देईल. मात्र गुंतवणुकीला घर खरेदी करण्याचा रस्ता बनवावा. याचा अर्थ स्पष्ट आहे, आधी पैसे जमा करा आणि त्यानंतर संपत्ती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world