जाहिरात

Gold, Silver Rate Today : गुंतवणूकदारांची चांदी, दर एक लाखाच्या पलिकडे; सोन्याच्या दरातही मोठी उसळी

सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये (Jalgaon Silver rate today without GST) GST शिवाय एक किलो चांदीचा दर  97 हजार 500 रुपये इतका होता. GST सह हा दर 1 लाख 420 रुपये इतका झाला आहे. (Silver rate today with GST)

Gold, Silver Rate Today :  गुंतवणूकदारांची चांदी, दर एक लाखाच्या पलिकडे; सोन्याच्या दरातही मोठी उसळी
जळगाव:

मंगेश जोशी

सोनं आणि चांदी दोन्हीच्या दरात (Gold And Silver Price on 13 February 2025)  गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. सोन्या, चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना (Investment in Gold and Silver)  चांगला परतावा मिळताना दिसतो आहे. गुरुवारी 1 किलो चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला. सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये जीएसटीशिवाय एक किलो चांदीचा दर  97 हजार 500 रुपये इतका होता. जीएसटीसह हा दर 1 लाख 420 रुपये इतका झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चांदीप्रमाणे सोन्याच्याही दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2025 रोजी जळगावमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा GST शिवाय दर  भाव 85 हजार 900 रुपये इतका नोंदवण्यात आला तर जीएसटीसह हा दर 88 हजार 477 रुपयांवर पोहोचला आहे. 

नक्की वाचा :कसं असेल नवं कर विधेयक? तुम्हाला फायदा काय होणार? वाचा महत्त्वाची वैशिष्ट्ये

सोने आणि चांदी दोन्हीचे दर गेले काही दिवस सातत्याने वाढत चालल्याचे बघायला मिळत आहे. लग्नसराईचा काळ जवळ आला असून येत्या काही महिन्यात सोने आणि चांदी दोन्हीचे दर हे नवा उच्चांक प्रस्थापित करेल अशी दाट शक्यता आहे. येत्या सहा महिन्यात 10 ग्रॅम सोने 1 लाखांचा टप्पा पार करेल अशी शक्यता ऑल इंडिया जेम्स अँण्ड ज्वेलर्स असोशिएशनचे राजेश रोकडे यांनी वर्तवली आहे.

नक्की वाचा : गेल्या आठवड्यात गुरुवारी सोन्याचे दर किती होते ? वाचा सविस्तर

सोन्यामधील गुंतवणुकीवरील परतावा हा चांगला मिळणार असल्याने गुंतवणूकदारांनी ही संधी दवडू नये असा सल्ला रोकडे यांनी दिला आहे. नव्या वर्षाची सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारात तेजीपेक्षा मंदीचे वातावरण दिसून येत आहे. यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कमीअधिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगला परतावा मिळवायचा असेल तर सोन्यातील गुंतवणुकीशिवाय सध्या पर्याय नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नक्की वाचा : अदाणी समूह सुरू करणार भारतातील सगळ्यात मोठा कौशल्य आणि रोजगार उपक्रम, मेक इन इंडिया उपक्रमाला मिळणार बळकटी

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी, युद्धे किंवा युद्धजन्य परिस्थिती याचा थेट परिणाम भारतातील शेअर बाजारावर होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत विराजमान झाल्यानंतर विविध देशांवर अतिरिक्त कर लादण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुंबई शेअर बाजाराला ही बाब फार आवडलेली दिसत नाही, ज्यामुळे शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी, गेले काही दिवस सतत पडताना दिसत होते. रोकडे यांनी गुंतवणुकीवर झटपट चांगला परतावा हवा असेल तर सोन्यातील गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही असे म्हटले आहे, गरज भासल्यास कर्ज काढा आणि सोन्यात गुंतवणूक करा असाही सल्ला त्यांनी दिला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: