लोकसभा एग्झिट पोलनंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 2 हजार तर निफ्टीचा नवा विक्रम

18 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

18 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि लोकसभा एग्झिट पोलनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 2 हजार तर निफ्टी 870 अंकानी वधारला. प्री ओपनिंगमध्ये निफ्टीची 1 हजार अंकांनी उसळी पाहायला मिळत आहे. निफ्टी 23337 अंकावर पोहोचल्यामुळे नवा विक्रम नोंदविण्यात आला आहे. निफ्टी पुन्हा 23 हजाराच्या उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 3 मे 2024 रोजी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. प्री-ओपनिंग सेशनमध्ये बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीची जबरदस्त सुरुवात झाली. यादरम्यान सेन्सेक्स 2622 अंकाच्या उसळीसह 3.55 टक्क्यांच्या तेजीसह 76,583 वर पोहोचला आणि निफ्टीही  807 अंकासह 3.58 टक्क्यांनी वाढत 23,338 च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. 

यावेळी मार्केट सुरू झाल्यानंतरही शेअर बाजारात उसळी सुरू आहे. त्यामुळे सेन्सेक्स 76,738.89 च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर निफ्टीदेखील 23,338.70 च्या नव्या उच्चांक विक्रमावर व्यवहार करीत आहे. 

नक्की वाचा - Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर

यासोबत अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अदाणी ग्रुपची  फ्लॅगशिप कंपनी अदाणी एंटरप्रायजेज जबरदस्त वाढीसह उघडला. सकाळी 9.16 वाजेच्या सुमारास कंपनीचे शेअर्स 228.65 (6.70%) अंकाच्या तेजीसह 3,640.00 अंकांवर व्यवहार करीत होते. काही वेळानंतर अदाणी एंटरप्रायजेजचा शेअर 3,725.00 च्या पातळीपर्यंत पोहोचला, जो याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.   

Advertisement

आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बीएसईचा 30 शेअरवर आधारित इंडेक्स सेन्सेक्स 75.71 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी वाढून 73,961.31 वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 42.05 अंक म्हणजेच 0.19 टक्क्यांनी वाढून 22,530.70 अंकावर बंद झाला होता. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये एकूण  1,449 अंकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर निफ्टीमध्येही 426 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती.