जाहिरात

Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर

Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. जाणून घ्या दुधाचे नवे दरे...

Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर

Amul Milk Price Hike: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. अमूल दूध दोन ते तीन रुपये किंमतीने महागले आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन रुपये प्रतिलिटर वाढ म्हणजे एकूण किंमतीत तीन-चार टक्के वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या.

(नक्की वाचा: टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स)

कोणते दूध किती रुपयांनी महागले?

दूधप्रमाणपूर्वीचे दर नवे दर
अमूल गोल्ड दूध

500 एमएल

एक लिटर

 33 रुपये

 64 रुपये

 34 रुपये

 66 रुपये

अमूल ताजा दूध

500 एमएल

एक लिटर

 27 रुपये

 54 रुपये

 28 रुपये

 56 रुपये

अमूल गाईचे दूध

500 एमएल

एक लिटर

 28 रुपये

 56 रुपये 

 29 रुपये

 57 रुपये

अमूल म्हशीचे दूध

500 एमएल

एक लिटर

 35 रुपये

 70 रुपये

 37 रुपये

 73 रुपये

अमूल स्लिम अँड ट्रिम (एसएनटी)

500 एमएल

एक लिटर

 24 रुपये

 48 रुपये 

 25 रुपये

 49 रुपये

(नक्की वाचा: अदाणी ग्रुपमधील गुंतवणुकीमुळे GQG पार्टनर्स मालामाल, 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक 11.48 बिलियन डॉलरवर)

दुधाच्या किंमती का वाढवण्यात आल्या? 

दरवाढीबाबत GCMMFने सांगितले की, "दूध उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूलच्या धोरणानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी मोजलेल्या एक रुपयापैकी जवळपास 80 पैसे दूध उत्पादकांना जातात. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल".

(नक्की वाचा: अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर)

Gautam Adani । गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मज्जाच मज्जा! नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये अल्पदरात दररोज मिळेल 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर
al-qaeda-influenced-terrorist-module-busted-by-delhi-police-joint-operation
Next Article
देशभरात 'अल कायदा' स्टाईल हल्ल्याचा कट उधळला, रांचीचा डॉक्टर होता प्रमुख