Tata Cars To Get Costlier From April 1 : टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीनुसार, नव्या किमती १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. ही वाढ साधारण ०.५ टक्क्यांपर्यंत असेल. मात्र, वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सनुसार थोडा फरक असू शकतो. कंपनीने सांगितलं की, गाड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल आणि पार्ट्सच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे Production Costs मध्ये वाढ झाली आहे. परिणामी कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहकांवर काय होईल परिणाम?
गाड्यांच्या वाढलेल्या किमतीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल. जे लोक नवी कार खरेदी करण्याचा प्लान करीत आहेत, त्यांना आता अधिक पैसे खर्च करावे लागतील. मात्र गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं कंपनीने सांगितलं. टाटा मोटर्सने यापूर्वी आपली व्यावसायिक वाहनांची किमती वाढविण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये साधारण १.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, कंपनी प्रत्येक विभागातील वाढत्या खर्चात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे.
नक्की वाचा - Cab Scam: सावधान! 285 रुपयांच्या राईडचं 6000 रुपये बिल... धक्कादायक कॅब स्कॅम, तुम्हीही व्हा अलर्ट
उदाहरणार्थ जर टाटाची एखादी कार १०.५ लाखांपर्यंत असेल तर नव्या वाढीनुसार ६ हजारांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण ऑटो क्षेत्रावर परिणाम...
संपूर्ण ऑटो क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागडे धातू आणि कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ज्याचा परिणाम सर्व कंपन्यांवर होत आहे. जर्मनीची लग्जरी कार कंपनी Audi नेही भारतातील आपल्या कारची किमती तब्बल दोन टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मारुती सुझुकीदेखील किमतीत वाढ करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांना नवी कार खरेदी करणं महाग होईल. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर १ एप्रिल २०२६ पूर्वी कार खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world