Tata iCNG Vs Maruti S CNG Cars Mileage : भारतीय बाजारात सीएनजी कारची लोकप्रियता सतत वाढताना दिसत आहे. यामध्ये टाटा आणि मारुती सुजुकी दोन सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. अनेकदा असा प्रश्न पडतो की, मारुती सुजुकीच्या सीएनजी कारचं मायलेज टाटाच्या तुलनेत चांगलं का असतं? अशावेळी तु्म्ही काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. दोन्ही कारमधील फरक केवळ इंजिनाचा नाही, तर दोन्ही कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य देण्याबाबत आहे. मारुती सुजुकीच्या सीएनजी कारमध्ये जास्त मायलेच देण्यावर जोर दिला जातो, तर टाटा मोटर्स आपल्या कारमध्ये सेफ्टी आणि मजबुतीसह चांगला परफॉमन्स आणि ड्रायव्हिंग अनुभवावर अधिक लक्ष देतो.
बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी...
टाटाच्या सीएनजी कारचं मायलेज कमी असण्याचं प्रमुख कारण वजन हे आहे. टाटा आपल्या कार ग्लोबल एनकॅपसारख्या रेटिंगसाठी उच्च स्तरिय सुरक्षा आणि मजबूत स्टील बॉडीसह तयार करतात. या अतिरिक्त वजनामुळे कार रस्त्यावर चांगली स्टेबिलिटी देते. पण जड वजन ओढण्यासाठी इंजिनला जास्त शक्ती लावावी लागते, ज्यामुळे साहजिकच इंधनाचा वापर वाढतो.
इंजिन क्षमता आणि परफॉमन्स...
मारुती सुजुकीच्या अधिकांश सीएनजी कार लहान १.० लीटर इंजिनासह येतात. जे विशेषत: चांगल्या मायलेजसाठी ट्यून केले जातात. दुसरीकडे टाटा मोटर्स सर्वसाधारणपणे १.२ लीटर आणि खास टर्बो इंजिनचा वापर करते. हे इंजिन अधिक पॉवर आणि टॉर्क देतं. ज्यामुळे कार चालविण्याचा अनुभव चांगला आणि आरामदायी होतो. मात्र ही कार मायलेजबाबत छोट्या इंजिनाशी तुलना करू शकत नाहीत.
डिझायन आणि एयरोडायनॅमिक्सची भूमिका...
टाटा मोटर्स पंच किंवा नेक्सॉन सारख्या सीएनजी एसयूव्हीचं डिझाइन दणकट किंवा मस्कुलर आहे. ज्यामुळे या कारला एक जबरदस्त लूक येतो. मात्र, या दणकट रचनेमुळे वाऱ्याचा प्रतिकार वाढतो, ज्यामुळे कार जास्त वेगात असताना मायलेजवर परिणाम होतो. तर मारुतीच्या कार अधिकांश हलक्या आणि स्लीक डिझाइनच्या असतात. या कार हवेला कापत कमी इंधनमध्ये जास्त अंतर पार करण्यास मदत करतात.
टाटाची आयसीएनजी आणि मारुतीची एस-सीएनजीच्या खास गोष्टी...
टाटाची iCNG टेक्नॉलॉजी पूर्णपणे सेफ्टी आणि व्यावहारिकतेवर केंद्रीत आहे. यामध्ये लिक डिटेक्शन, ऑटो-कट ऑफ आणि थर्मल प्रोटेक्शनसारखे फिचर्स असतात. ज्यामुळे सुरक्षा वाढते. तर दुसरीकडे मारुती सुजुकीच्या S-CNG टेक्नॉलॉजीचा विकास गेल्या अनेक दशकांपासून मायलेज आणि कार्यक्षमता लक्षात ठेऊन करण्यात आला आहे.
मारुती सुजुकी आणि टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध CNG कार...
टाटा मोटर्सची पंच, नेक्सॉन, टियागो आणि टिगोरसह अल्ट्रोज सारखे सीएनजी पर्याय उपलब्ध आहेत. टाटाच्या सीएनजी कारची मायलेज २५-२७ किलोमीटर प्रति किलोग्रॅम सीएनजीपर्यंत आहे. तर मारुती सुजुकीच्या अधिकांश कार सीएनजीच्या पर्यायासह येतात. यामध्ये अल्टो १०, एस-प्रेसो, सिलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, डिजायर, बलेनो, फ्रॉन्क्स, ब्रिजा, अर्टिगा, विक्टोरिस, ग्रँड विटारा सारख्या कार प्रसिद्ध आहेत. मारुतीच्या सीएनजी कारची इंधन क्षमता ३५ किलोमीटर प्रतिकिलोग्रॅम सीएनजीपर्यंत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world