जाहिरात

Union Budget 2025 : तयार उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढणार ? कराचे टप्पेही कमी करण्याचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, खनिजे भारतातूनकाढली जातात. त्यावर इतर देशांमध्ये प्रक्रिया होते आणि त्यापासून उत्पादने तयार केली जातात. ही तयार उत्पादने पुन्हा भारतात आणून ती विकली जातात, हे योग्य नाही.

Union Budget 2025 : तयार उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढणार ? कराचे टप्पेही कमी करण्याचा विचार
मुंबई:

Budget 2025 Custom Duty : भारतातील कच्चा मालाचा वापर करून इतर देशात उत्पादन तयार करून ते पुन्हा भारतात आणून विकणे हे अयोग्य असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी व्यक्त केले होते. ओडिशामधील भुवनेश्वर  (Bhubaneswar, Odisha) इथे उत्कर्ष ओडिशा, मेक इन ओडिशा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. सध्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचे त्यांनी संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेल्या मताचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातही दिसण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून भारत सरकार तयार वस्तूंच्या आयातीवर लागणारी कस्टम ड्युटी (Custom Duty In India) वाढवण्याची शक्यता आहे. खासकरून इलेक्ट्रॉनिक उत्पादने (Custom Duty On Electrical Appliances) , वैद्यकीय उत्पादने (Custom Duty On Medical Equipments) आणि अशाच स्वरुपाच्या इतर गोष्टींवरील कस्टम ड्युटी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या गोष्टींच्या किंमती वाढतील असे बोलले जात आहे. 

नक्की वाचा :केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल की महाग? 

देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी निर्णय

सध्या वॉशिंग मशीन, डिशवॉशरसारख्या इलेक्ट्रीक वस्तूंवर 10 टक्के कस्टम ड्युटी आकारली जाते. हे शुल्क वाढवले जाऊ शकते. व्हिएतनाममधून येणारे ब्लड प्रेशर मोजण्याचे मशीन, ऑक्सिमीटर यासारख्या उत्पादनांवरीलही कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मेक इन इंडिया मोहिम हाती घेतली असून यामध्ये सईपासून उपग्रहापर्यंत हरतऱ्हेच्या वस्तूंचे भारतामध्येच उत्पादन व्हावेयासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना बळकटी मिळावी यासाठी कस्टम ड्युटी वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

नक्की वाचा : बजेटमधून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

कस्टम ड्युटीचे टप्पे कमी करण्याचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, खनिजे भारतातून काढली जातात. त्यावर इतर देशांमध्ये प्रक्रिया होते आणि त्यापासून उत्पादने तयार केली जातात. ही तयार उत्पादने पुन्हा भारतात आणून ती विकली जातात, हे योग्य नाही. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले की, प्रक्रियेचे काम हे भारतामध्येच झाले पाहीजे.  कस्टम ड्युटीच्या सध्याच्या टप्प्यांचा फेरआढावा घेण्याचे काम सुरू आहे. या शुल्काचे सध्या 12 ते 13 टप्पे आहेत. हे टप्पे कमी करून 5 करण्याचा विचार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com