जाहिरात

Gold Price Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल की महाग? 

Union Budget 2025 : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सोन्याच्या किमतीत मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे.

Gold Price Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल की महाग? 

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं कठीण होत आहे. भारतात आज सोन्याचा भाव (Gold Prices) 24 कॅरेटसाठी 80,819 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. काल 29 जानेवारी रोजी सोन्याचे दर 83 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. आज ही सोन्याच्या (Gold Rate In India) दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून सोन्याचे दर 80,819 पर्यंत घसरले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 पूर्वी (Union Budget 2025) सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, मंगळवारी सोनं 82,840 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. बुधवारी याच वाढ होऊन 83,750 पर्यंत पोहोचला. जानेवारी महिन्याचा विचार करता सोन्याची किमतीत 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून आतापर्यंत 4,360 रुपयांनी वाढ झाली आहे. 99.5 टक्के शुद्ध असणाऱ्या सोन्याच्या किमतीत 910 रुपयांची वाढ होऊन 83,350 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलं आहे. चांदीच्या किमतीही 92,000 रुपयांनी वाढ होऊन 93,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलं आहे. 

Union Budget 2025 : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती

नक्की वाचा - Union Budget 2025 : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती

मिंटने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात सोन्यावर सीमा शुल्क (Custom Duty) वाढवला जाऊ शकतो. जर असं झालं तर सोन्याची आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याच्या किमती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

सिंगल गोल्ड रेग्युलेटरची मागणी...
सोन्याचा विविध पद्धतीने व्यवसाय केला जातो. गोल्ड ईटीएफ (Gold ETF), डिजिटल गोल्ड (Digital Gold) आणि फिजिकल गोल्ड (Physical Gold). त्यामुळे याचे विविध रेग्युटेलरद्वारे नियमन केलं जातं. या नियामकांमध्ये सिक्युरिटीज रेग्युलेटरी बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांचा समावेश आहे. वित्त मंत्रालय (Ministry of Finance) आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयदेखील सोन्याच्या व्यवसायावर लक्ष ठेवून आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com