अदाणींविरोधात खटला हा अमेरिकेची उधळपट्टी, ट्रम्प सगळं नीट करतील! जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञाला ठाम विश्वास

अदाणी समूहाविरोधात अमेरिकेमध्ये दाखल करण्यात आलेला खटला हा राजकीदृष्ट्या प्रेरीत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर मोबियस यांनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समूहाच्या अधिकाऱ्यांविरोधात अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने दाखल केलेला खटला ही निव्वळ पैशांची उधळपट्टी असल्याचं जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ  मार्क मोबियस यांनी म्हटले आहे. IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना मोबियस यांनी म्हटले की, हा खटला पैशांच्या उधळपट्टीशिवाय दुसरं काहीही नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला की ते या सगळ्या गोष्टी दुरुस्त करतील असेही मोबियस यांनी म्हटले आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर परदेशी व्यावसायिकांविरोधात सरकारी विभागांद्वारे करण्यात येणाऱ्या या उचापती बंद होतील असा विश्वास मोबियस यांनी व्यक्त केला.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अदाणी समूहाविरोधात अमेरिकेमध्ये दाखल करण्यात आलेला खटला हा राजकीदृष्ट्या प्रेरीत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर मोबियस यांनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 

नक्की वाचा : 'आम्हाला अमेरिकेकडून कोणतीही सूचना नाही', अदाणी प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मोबियस ईएम अपॉर्च्युनिटीज फंडचे संचालक म्हणून मार्क मोबियस यांची ओळख आहे. त्यांनी म्हटले की,  येत्या काळात अदाणी प्रकरणाच्या चौकशी आणि खटल्यापासून अमेरिकेतील कायदा मंत्रालय स्वत:ला वेगळं करण्याची दाट शक्यता आहे.  त्यांनी म्हटले की येत्या काळात अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाची पुनर्रचना केली जाईल आणि त्यांना देशाबाहेरच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याऐवजी देशांतर्गत अधिक लक्ष घालण्यास सांगितले जाऊ शकेल. 

नक्की वाचा :लाचखोरीच्या आरोपानंतरही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अदाणी समुहावर विश्वास

मार्क मोबियस हे मोबियस कॅपिटल पार्टनर्सचे संस्थापक असून त्यांनी म्हटलंय की, बऱ्याच गुंतवणूकदारांना हे वाटत आहे की अदाणी समूहावर सध्या दबाव आहे मात्र सगळ्या गोष्टी येत्या काही दिवसांत ठीक होतील. अदाणी समूहाचा व्यवसाय उत्तम चालत राहील आणि त्यांचे समभागही चांगली कामगिरी करताना दिसतील. मोबियस यांनी अदाणी समूहाविरोधात दाखल केलेल्या खटल्याबद्दल बोलताना म्हटले की, अदाणींनी काय चूक केली आहे ? जर त्यांनी चूक केली असेल तर त्यासाठीचा खटला भारतात का दाखल करण्यात आला नाही ? 

Advertisement

या विपरीत परिस्थितीमध्ये अदाणी समूहाचे शेअर्स पटकन सावरले आणि पुन्हा वाढायला लागले. यामुळे अदाणी समूहाच्या मागे हात धुवून लागलेल्या हेज फंडांची अवस्था ढिली पडत चालली आहे असेही मोबियस यांचे निरीक्षण आहे. अमेरिकेच्या कायदा विभागाने आणि अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने अदाणी समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला आहे. अदाणी समूहाने पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.   

Topics mentioned in this article