जाहिरात

लाचखोरीच्या आरोपानंतरही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अदाणी समुहावर विश्वास

विशेष म्हणजे अमेरिकन यंत्रणांने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांचे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी खंडन केलं आहे.

लाचखोरीच्या आरोपानंतरही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अदाणी समुहावर विश्वास
मुंबई:

अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणात झालेले आरोप अदाणी समुहाने फेटाळले असून या आरोपांनंतरही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी अदानी समुहावर विश्वास व्यक्त केला आहे. सौदी अरेबियातल्या अबुधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने अदाणी समुहातली आपली गुंतवणूक कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच हरित ऊर्जा क्षेत्रातलं अदाणी समुहाचं महत्त्वही या कंपनीने मान्य केलं आहे. तसंच केरळ सरकारने विझिंग्यम बंदरासाठी पूरक करार केला असून पायाभूत सुविधांची उभारणी आणि आर्थिक विकासातला भागीदार म्हणून अदाणी समुहावर विश्वास व्यक्त केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टांझानियातल्या कंटेनर टर्मिनलच्या उभारणीसाठी टांझानियाच्या सरकारने अदाणी पोर्टसोबत झालेल्या करारात कोणताही बदल होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून अदाणी समुहाच्या समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अदाणी पॉवरच्या शेअर्समध्ये 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अदाणी समूहाचा मोठा सन्मान, TIME नं तयार केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपनीच्या यादीत समावेश

नक्की वाचा - अदाणी समूहाचा मोठा सन्मान, TIME नं तयार केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपनीच्या यादीत समावेश

विशेष म्हणजे अमेरिकन यंत्रणांने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांचे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी खंडन केलं असून लंडन स्टॉक एक्चेंज ग्रुपचे सीईओ डेव्हिड श्वीमर यांनीही अदाणी समुहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारणी करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचं मत नोंदवलंय. तसंच भारतातले इस्रायली राजदूत नोर गिलोन यांनीही अदाणी समुहाला पाठिंबा दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com