जाहिरात

Personal Loans: लोक गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? जाणून घ्या बदललेली मानसिकता

भारतीय ग्राहकांमध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत मोठी वैचारिक क्रांती झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीला हात न लावता, आरोग्य, प्रवास आणि जीवनशैली सुधारण्यासाठी 'स्मार्ट अर्नर्स' कर्जाचा पर्याय निवडत आहेत.

Personal Loans: लोक गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? जाणून घ्या बदललेली मानसिकता

वैयक्तिक कर्ज म्हणजे केवळ संकटात घेतलेली मदत, ही जुनी धारणा आता मोडीत निघाली आहे. आजचा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग स्वतःच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि अगदी फिरण्यासाठीही आत्मविश्वासाने कर्ज घेत आहे. विशेषतः कोविड-19 च्या साथीनंतर 'आजचा दिवस भरभरून जगण्या'कडे लोकांचा कल वाढला असून, त्यासाठी भविष्यातील बचतीला धक्का न लावता कर्जाचा मार्ग निवडला जात आहे.

गुंतवणुकीचे संरक्षण आणि कर्जाचा वापर

आजचे कर्जदार अधिक व्यवहार्य झाले आहेत. त्यांच्याकडे SIP,  शेअर्स आणि निवृत्तीसाठीचा मोठा पोर्टफोलिओ असतो. हा पोर्टफोलिओ मोडल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा थांबतो आणि भांडवली नफ्यावर (Capital Gain) कर भरावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी लोक आपली दीर्घकालीन उद्दिष्टे सुरक्षित ठेवून, केवळ मासिक हप्त्याद्वारे (EMI) वर्तमानकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. तसेच यामुळे निश्चित हप्ता माहीत असल्याने दैनंदिन खर्चाचे नियोजन करणे सोपे जाते.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

वैयक्तिक कर्जाचा वापर आता कशासाठी होतोय?

  • केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे (Wellness Retreats) किंवा ध्यानासाठी कर्ज घेतले जात आहे.
  • केसांचे प्रत्यारोपण (Hair Transplant), सौंदर्योपचार किंवा कौशल्य विकासासाठी लोक गुंतवणूक म्हणून कर्ज घेतात.
  • लग्नसराई किंवा महत्त्वाच्या उत्सवांचा आनंद घेण्यासाठी वेळेत पैसा उपलब्ध व्हावा म्हणून कर्जाचा वापर वाढला आहे.
  • सर्व लहान-मोठी देणी एकाच हप्त्यात सामावून मन:शांती मिळवण्यासाठी अनेक ग्राहक वैयक्तिक कर्ज घेतात.

(नक्की वाचा-  Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)

कोटक महिंद्रा बँकेचे पर्सनल लोन्स विभागाचे प्रमुख अमित पाठक यांनी म्हटलं की, "आम्हाला आत्मविश्वासपूर्ण स्थित्यंतर दिसत आहे. उत्तम उत्पन्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी असलेले ग्राहक स्वास्थ्य, आयुष्यातील अनुभव व दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या आकांक्षा आदी अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता, व्यक्तीगत कर्जाचा उपयोग करत आहेत. कोविड साथीनंतर अनेक जण स्वत:ची काळजी घेणे व दीर्घकाळ बाळगलेली स्वप्ने पूर्ण करणे या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत, या गोष्टींकडे आता चैन म्हणून बघितले जात नाही. शिस्तीने उभ्या केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुका थांबवणे किंवा मोडणे टाळण्यासाठी ते कर्ज काढत आहेत. व्यक्तीगत कर्जामुळे त्यांना वर्तमानकाळ भरभरून जगण्यात आणि त्याच वेळी भविष्यकाळातील नियोजन सुरक्षित राखण्यात मदत होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com