बाईक खड्ड्यात आदळल्याने सुतळी बॉम्बचा स्फोट, बाईकस्वाराचा मृत्यू, Video

दुचाकीवरून साथीदारासह जात असताना बाईकस्वार खड्ड्यात आदळला. यामुळे बाईकवरून जाणाऱ्यांकडे असलेले फटाक्यांचे पोते पडले आणि त्याचा मोठा स्फोट झाला

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यात एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.  दुचाकीवरून साथीदारासह जात असताना बाईकस्वार खड्ड्यात आदळला. यामुळे बाईकवरून जाणाऱ्यांकडे असलेले फटाक्यांचे पोते पडले आणि त्याचा मोठा स्फोट झाला. दिवाळीत गल्लोगल्ली मिळणारे सुतळी बॉम्ब किती घातक आहेत हे या घटनेवरून दिसून आलं आहे. या सुतळी बॉम्बेची तीव्रता ही आईडी इतकी असल्याचे सांगितले जाते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून यामध्ये दिसतंय की पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवरून दोघेजण जात होते. स्कूटरवर पाठी बसलेल्या व्यक्तीच्या हातात पांढऱ्या रंगाचे पोते दिसत आहे. या पोत्यामध्ये सुतळी बॉम्ब होते. एका मंदिराजवळ आल्यानंतर ही स्कूटर खड्ड्यात आदळली आणि पोतं खाली पडलं. पोत्यातील बॉम्ब रस्त्यावर पडले आणि डोळ्याचं पात लवतं ना लवतं तोच मोठा स्फोट झाला. ही घटना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास झाल्याचे सीसीटीव्हीतील वेळेनुसार दिसते आहे. 

( नक्की वाचा : गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्... )

ही घटना घडली तेव्हा रस्त्याच्या कडेला काही तरूण गप्पा मारत होते, ते या स्फोटामुळे किरकोळ जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या तरुणांच्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकचे मोठे नुकसान झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव दुर्गासाई सुधाकर (30 वर्षे)  असल्याचे कळाले आहे. त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव ताबेती साई असल्याचे कळाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला आहे.  

ही घटना थुरू विधी येथील गंगानम्मा मंदिराजवळ झाली. या स्फोटात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला तर साई हा गंभीररित्या जखमी झाला. एस.ससी, के.श्रीनिवास राव, खादर, सतीश आणि सुरेश अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article