जाहिरात

गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. त्यामुळे प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असते.

गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...
लखनऊ:

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. त्यामुळे प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असते. अगदी एकमेकांना भेटण्यासाठी परिस्थितीही पाहिली जात नाही. यामुळे अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्तर प्रदेशातील मऊमधून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. येथे प्रेयसीने बोलवल्यावर तरुण बलिया जिल्ह्यातून मऊ तिच्या घरी पोहोचला. मात्र प्रेयसीच्या खोली जाण्याऐवजी तो चक्क प्रेयसीच्या आईच्या खोलीत पोहोचला. यानंतर तरुणाला याचे परिणाम भोगावे लागले. 

तरुणाला सर्वांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तरुणाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यानंतर पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर त्याला आपल्या जिल्ह्यात घेऊन गेले. ही घटना 20 ऑक्टोबरची आहे. 

प्रेयसीने बोलावलं होतं घरी...
बलिया जिल्ह्यात हुसैनाबाद येथे राहणारा तुषार कदम (26) याचे हाफिजपूर येथील तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. यानंतर ते चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू लागले. चॅटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम जुळलं. तरुणीने त्याला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावलं. तरुणीच्या म्हणण्यानुसार तो तयारही झाला. तरुणीने आपलं गुगल लोकेशन त्याला पाठवलं. 

राज्यात आणखी एक हिट अँड रन; ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मर्सिडीज कार धडकेत मृत्यू

नक्की वाचा - राज्यात आणखी एक हिट अँड रन; ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मर्सिडीज कार धडकेत मृत्यू

तरुणीच्या आईने घातला गोंधळ...
प्रेयसीच्या म्हणण्यानुसार तरुण बलियाहून रविवारी साधारण 3 वाजता प्रेयसीच्या घरी पोहोचला. इतकच नाही तर प्रेमात वेडा झालेला तरुण दुसऱ्या मजल्यावर चढला. तो प्रेयसीला भेटायला आतूर झाला होता. यात तरुणाने चूक केली.  तरुण प्रेमिकेच्या खोलीऐवजी तिच्या आईच्या खोलीत शिरला. तरुणीच्या आईने आपल्या समोर अज्ञान तरुणाला पाहून गोंधळ घातला. तरुणीच्या आईचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी तरुणाला पकडलं. 

तरुणाला कुटुंबीय घेऊन गेले...
तरुणाला पकडल्यानंतर त्याला सर्वांनी मारहाण केली. कसा बसा जीव वाचवून त्याने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यानंतर तो गंभीर जखमी झाला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. याची माहिती मिळताच तरुणाचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. यानंतर ते त्याला घरी घेऊन गेले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
शिक्षिकेने चापट मारल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी, ICU मध्ये मृत्यूशी झुंज
गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...
Five Naxalites killed in operation on Chhattisgarh border
Next Article
निवडणुकीपूर्वी घातपाताचा कट; छत्तीसगड सीमेवरील कारवाईत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा