जाहिरात

LPG Cylinder: बाजारात येणार 10 किलोचा LPG सिलेंडर? कुणाला होणार फायदा आणि किती असेल किंमत?

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्या लवकरच 10 किलो वजनाचा हलका कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडर बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.

LPG Cylinder: बाजारात येणार 10 किलोचा LPG सिलेंडर? कुणाला होणार फायदा आणि किती असेल किंमत?

देशातील आघाडीच्या सरकारी तेल कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) ग्राहकांच्या सुविधेसाठी एलपीजी (LPG) सिलेंडरच्या रचनेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत. सरकारी तेल कंपन्या लवकरच 10 किलो वजनाचा हलका कमर्शियल एलपीजी सिलेंडर बाजारात आणणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हे सिलेंडर गॅस एजन्सी आणि काही निवडक रिटेल दुकानांवर कमर्शियल दराने उपलब्ध होऊ शकतील.

भारताच्या एलपीजी बाजारातील बदल

मिडिल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या एलपीजी बाजारपेठेत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या काळात सरकारने पीएनजी नेटवर्कचा वेगाने विस्तार केला, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी एलपीजीऐवजी पीएनजी कनेक्शन घेण्यास पसंती दिली.  याच काळात 5 किलो वजनाच्या 'छोटू' सिलेंडरची मागणीही झपाट्याने वाढली. आता याच पार्श्वभूमीवर 10 किलोचा कमर्शियल सिलेंडर आणण्याची तयारी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.

10 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा प्लॅन काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या 10 किलो वजनाचा हलका कंपोझिट एलपीजी सिलेंडर व्यावसायिक ग्राहकांसाठी आणण्याचा विचार करत आहेत. सध्या कमर्शियल ग्राहकांसाठी 19 किलो, 5 किलो आणि 2 किलोचे एलपीजी सिलेंडर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की, 5 किलो आणि 19 किलोच्या दरम्यानचा एखादा सुटसुटीत पर्याय उपलब्ध असावा. 10 किलोचा हा नवीन सिलेंडर नेमकी हीच गरज पूर्ण करणार आहे.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

कोणाला होणार याचा सर्वात जास्त फायदा?

  • छोटे व्यावसायिक, चहाची टपरी आणि फूड स्टॉल चालक.
  • कॅफे, फूड किओस्क आणि छोटे रेस्टॉरंट्स.
  • शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहणारे विद्यार्थी आणि मजूर वर्ग.

ज्या नागरिकांकडे 19 किलोचा मोठा सिलेंडर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा तो उचलण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी हा 10 किलोचा हलका सिलेंडर अत्यंत सोयीचा ठरेल.

किंमत किती असणार?

तेल कंपन्या हा 10 किलोचा सिलेंडर कमर्शियल एलपीजीच्या दरांवर विकण्याची तयारी करत आहेत. सध्याच्या किमतींवर नजर टाकली तर दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 942 रुपयांना मिळतो. तर 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर 2930 रुपयांना आणि 5 किलोचा कमर्शियल सिलेंडर 808.50 रुपयांना उपलब्ध आहे. 10 किलोच्या या नवीन सिलेंडरची किंमत अद्याप अधिकृतपणे ठरलेली नाही. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे दर जाहीर केले जातील.

नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

देशात गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता नाही

पश्चिम आशियात सध्या पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही स्पष्ट केले होते की, भारताकडे सध्या सुमारे 60 दिवसांचा कच्चा तेल, 60 दिवसांचा एलएनजी आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा सुरक्षित आहे. मात्र, हा आंतरराष्ट्रीय तणाव दीर्घकाळ राहिल्यास येत्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या खरेदीचा खर्च वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com