घरातील एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर अचानक संपला की, बुकिंग करणे आणि तो घरी येईपर्यंत वाट पाहणे ही मोठी डोकेदुखी असते. मात्र, आता तुम्हाला याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मोबाईलवरील स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) ॲप उघडून तुम्ही इतर किराणा सामानासारखाच गॅस सिलेंडरही ऑर्डर करू शकणार आहात आणि अवघ्या काही मिनिटांत तो तुमच्या दारात हजर असेल.
क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टने सरकारी तेल कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत भागिदारी करून 'ऑन-डिमांड एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी' सेवा सुरू केली आहे. या अभिनव सुविधेची सुरुवात सर्वात बंगळुरू शहरात होत असून, आगामी काळात देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही ही सेवा विस्तारली जाणार आहे.
10 किलो वजनाचा नवीन सिलेंडर
HPCL आणि स्विगी मधील हा करार केवळ जलद होम-डिव्हरीपुरता मर्यादित नाही, तर या माध्यमातून एचपीसीएलने एक अत्यंत आधुनिक उत्पादन बाजारात आणले आहे. या भागीदारी अंतर्गत कंपनीचा नवीन 10 किलो क्षमतेचा कंपोजिट एलपीजी सिलेंडर 'एचपी नव्या' (HP Navya) लाँच करण्यात आला आहे. पारंपरिक लोखंडी सिलेंडरच्या तुलनेत हा कंपोजिट सिलेंडर वजनाने अत्यंत हलका, हाताळण्यास सोपा आणि सुरक्षित आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
नवीन गॅस कनेक्शनची गरज नाही
सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार तरुणांचा विचार करून ही सेवा अत्यंत सुटसुटीत बनवण्यात आली आहे. स्विगी इन्स्टामार्ट ॲपवर ग्राहकांना सिलेंड बुक करण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध असतील.
- नवीन 10 किलो वजनाचा आधुनिक 'एचपी नव्या' कंपोजिट सिलेंडर.
- आधीपासूनच बाजारात लोकप्रिय असलेला 5 किलो वजनाचा 'छोटू' सिलेंडर.
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य
इन्स्टामार्टवरून गॅस सिलेंडर ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच कोणतेही एलपीजी गॅस कनेक्शन असणे अनिवार्य नाही. कोणताही नवीन युझर थेट ॲपवरून अत्यंत सहजतेने हा सिलेंडर बुक करू शकतो.
(नक्की वाचा- Rohit Sharma: रोहितच्या वनडे कारकिर्दीचा शेवट? 'या' खेळाडूसाठी निवृत्ती घ्यावी लागणार? BCCI वर नाराज)
क्विक कॉमर्सच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत मिळणारी ही गॅस डिलिव्हरी सेवा विशेषतः विद्यार्थी, एकटे राहणारे नोकरदार व्यावसायिक आणि छोट्या कुटुंबांसाठी वरदान ठरणार आहे. 14.2 किलो वजनाचा मोठा पारंपरिक सिलेंडर बुक करण्याच्या आणि त्यासाठी लागणाऱ्या लांबलचक कागदपत्रांच्या कचाट्यातून या वर्गाची सुटका होणार आहे. बंगळुरूमधील या सुविधेच्या यशस्वी प्रयोगानंतर, दोन्ही कंपन्या लवकरच मुंबई, पुणे आणि इतर महानगरांमध्ये ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world