Shocking News : आईने मोबाईल हिसकावून घेतला, 11 वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

Shocking News : कुटुंबीयांनी मुलीला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुंडीपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आईने तिचा मोबाईल हिसकावून घेतल्यामुळे 11 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या छिंदवाडा जिल्ह्यातील कुंडीपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. दीपिक असे मृत मुलीचे नाव आहे. ती आठवीची विद्यार्थिनी होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दीपिकाचने कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून सिवनी प्राणमोती येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा दीपिकाचे वडील कामासाठी बाहेर गेले होते आणि तिची आई आणि दोन बहिणी घरी उपस्थित होत्या.

(नक्की वाचा-  Nashik News : डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार)

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाला मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याची सवय होती. तिच्या या सवयीमुळे आईला राग आला आणि तिने तिच्याकडील मोबाईल काढून घेतला. मात्र आईने मोबाईल हिसवावून घेतला याचा दीपिकाला प्रचंड राग आला. यामुळे दुखावलेल्या दीपिकाने घरात ओढणीने फास घेऊन आत्महत्या केली. 

(नक्की वाचा-  Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)

मोठी बहीण घरात आली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तिने तातडीने ओरडून कुटुंबातील इतरांना याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलीला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुंडीपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article