जाहिरात
This Article is From Apr 14, 2025

Nashik News : डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार

13 एप्रिलच्या रात्री डिजेच्या दणदणाटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nashik News : डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार

Nashik News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला डीजेच्या दणदणाटामुळे एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नितीन फकिरा रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव आहे. नाशिकच्या पेठरोवरील फुलेनगर परिसरात काल 13 एप्रिलला रात्रीच्या वेळी ही घटना घडली. 

डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू हकीकतमध्ये नोंद करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला तीन पुतळ्याजवळ डीजे साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. यातून त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं मृत्यू ओढवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत नितीनला इतरही काही आजार होता का, याचाही तपास केला जात आहे. नितीनच्या मृत्यू नक्की कशामुळे झाला हे शव विच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. 

बातमी अपडेट होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com