18 भारतीय मच्छिमारांना श्रीलंका नौदलाकडून अटक, 4 बोटीही जप्त

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2024 मध्ये 180 हून अधिक भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

श्रीलंकेच्या नौदलाने 18 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे.  श्रीलंका हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्या तीन मासेमारी नौका देखील जप्त केल्या आहेत. 'द न्यूज फर्स्ट' या न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री केलेल्या शोध मोहिमेदरम्यान डेल्फ्ट बेटाजवळील उत्तर समुद्रात मच्छिमारांना अटक करण्यात आली.

श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन गायन विक्रमसूर्या यांनी सांगितले की, अटक केलेल्या मच्छिमारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कांकेसंथुराई बंदरात नेले जाईल. गेल्या आठवड्यात देखील 4 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली होती.  त्यांची मच्छिमारीची नौका देखील जप्त करण्यात आली होती.

(नक्की वाचा - झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली)

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2024 मध्ये 180 हून अधिक भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांचे 25 ट्रॉलर जप्त करण्यात आले होते. यापैकी बहुतेक घटना तामिळनाडूला श्रीलंकेच्या उत्तरेकडील टोकापासून वेगळे करणारी अरुंद सामुद्रधुनी, पाल्क स्ट्रेटमध्ये घडतात. दोन्ही देशांतील मच्छिमारांसाठी हे मासेमारीचे उत्तम ठिकाण आहे.

(नक्की वाचा: पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?)

मच्छिमारांचा मुद्दा हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंधांमधील वादग्रस्त मुद्दा आहे. श्रीलंकेच्या नौदलाने काहीवेळा पाल्क सामुद्रधुनीत भारतीय मच्छिमारांवर गोळीबार देखील केला आहे. श्रीलंकेच्या पाण्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्यांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article