जाहिरात

पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?

चोरट्यांनी चक्क पिकअप व्हॅनला बांधून एटीएम पळवण्याचा प्रयत्न केला. या एटीएममध्ये तब्बल 21 लाख 13 हजार 700 ची रोकड होती.

पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?
बीड:

स्वानंद पाटील

बीडच्या धारूरमध्ये चोरट्यांनी चक्क पिकअप व्हॅनला बांधून एटीएम पळवण्याचा प्रयत्न केला. या एटीएममध्ये तब्बल 21 लाख 13 हजार 700 ची रोकड होती. चोरट्यांनी हे एटीएम व्हॅनला बांधून तब्बल 61 किलोमिटरपर्यंत घेवून गेले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही या चोरट्यांचा पाठलाग केला. पोलिस जवळपास  चार तास या चोरट्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान या एटीएम चोरीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

बीडच्या धारूरमध्ये एसबीआयचे एटीएम मशीन आहे. हे लुटण्याची तयारी चार चोरांनी केली होती. त्यासाठी पिकअपचा वापर केला. ही चोरीची संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पहिले दोन चोर मोठा दोरखंड घेवून एटीएममध्ये घुसले. त्यांनी  चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यांनी ते दोरखंड एटीएम भोवती गुंडाळले. त्यानंतर ते एटीएमच्या बाहेर गेले. पिकप व्हॅन सुरू केली. जोरात झटका देताच एटीएम खाली पडले. त्यानंतर ते चोर पुन्हा आत आले. पुन्हा त्यांनी एटीएम भोवती दोरखंड लावले. दुसऱ्या प्रयत्ना संपुर्ण एटीएम मशिनी निखळून पडले. त्या नंतर हे एटीएम हे चारही चोरटे घेवून पळाले. त्यांनी हे मशिन त्याच पिकअप व्हॅनला बांधले होते. अवघ्या दोन मिनीटात हा कांड या चार चोरांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

दरम्यान या चोरीची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांनी कळवली. पोलिसांनीही लगेलच चोरांच्या मागे लागले. चोर पुढे तर पोलिस मागे होते. हा पाठलाग जवळपास 4 तास सुरू होता. चोर ते मशिन घेवून 61 किलो मिटर पर्यंत आले होते. पुढे ते दिसेनासे झाले. मात्र गेवराईतील जायकोवाडी शिवारात सकाळी 8.30 वा ही मशीन पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांना सापडली. मशीनमधील संपूर्ण रक्कम परत आणण्यात पोलिसांना यश आले. त्या एटीएममध्ये  21 लाख 13 हजार 700 ची रोकड होती. धारूरचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली.या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा तपास धारूर पोलीस करत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com