अमजद खान, कल्याण
डोंबिवलीतील खोणी पलावा या उच्चभ्रू परिसरामध्ये पिकअप टेम्पोने एका झोमॅटो कर्मचाऱ्याला फरफटत नेल्याची घटना घडली आहे. टेम्पो चालक आणि क्लीनरची मजामस्ती झोमॅटो कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली आहे. पिकअप टेम्पो चालकऐवजी क्लीनर चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला गाडी चालवता येत नव्हती. क्लीनरने टेम्पो भरधाव चालवला आणि रस्त्यावर उभा असलेल्या झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत त्याला फरफटतही नेले.
झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू
या अपघातामध्ये झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या क्लीनरला अटक केली. गाडीचा मालक कोण आहे? गाडी क्लीनरला चालवायला का दिली? यासह सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. पण हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(नक्की वाचा: पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?)
नेमके काय घडले?
डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात शनिवारी (22 जून) रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे. गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकाने आपले वाहन क्लीनरला चालवायला दिले. क्लीनरजवळ लायसन्स नव्हते, तरीही त्याने एवढी मोठी चूक केली. यादरम्यान क्लीनरचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने झोमॅटो बॉयला जोरदार धडक दिली. सौरभ यादव असे मृत तरुणाचे नाव आहे.
(नक्की वाचा: पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मुजोरी, जमिनीचा ताबा घेण्यासाठी हवेत गोळीबार)
याव्यतिरिक्त भरधाव टेम्पोने आठ दुचाकींनाही धडक दिली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्लिनर आतिष जाधवला ताब्यात घेतले. अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर आठ गाड्यांचे नुकसान झाले. यामुळे संतप्त नागरिकांकडून क्लीनरसह टेम्पो मालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
(नक्की वाचा: चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले)
Dilip Mohite यांच्या पुतण्याच्या कारचा अपघात, कारने दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world