जाहिरात

धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं होतं पेपरफुटीविरोधात आंदोलन, मोडली होती हाडं! जुन्या आंदोलनाची आज जोरदार चर्चा

Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका राज्यस्तरीय पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरून स्वतः लाठ्या खाल्ल्या होत्या.

धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं होतं पेपरफुटीविरोधात आंदोलन, मोडली होती हाडं! जुन्या आंदोलनाची आज जोरदार चर्चा
Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटीच्या आंदोलनाच्या विरोधात नेतृत्त्व केलं होतं.
मुंबई:


Dharmendra Pradhan NEET paper leak controversy: नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आज देशभर गदारोळ सुरू आहे. या मुद्यावर  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच, एक अत्यंत रंजक राजकीय योगायोग समोर आला आहे. आज ज्या पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षण मंत्र्यांची घेराबंदी केली जात आहे, तब्बल 29 वर्षांपूर्वी याच धर्मेंद्र प्रधान यांनी एका राज्यस्तरीय पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरून स्वतः लाठ्या खाल्ल्या होत्या. आज हेच जुने फोटो आणि आठवणी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काय आहे ते प्रकरण?

हा संपूर्ण प्रकार 1997 मधील आहे. त्यावेळी धर्मेंद्र प्रधान हे कोणतेही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी नव्हते, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) राष्ट्रीय सचिव आणि एक आक्रमक विद्यार्थी नेते होते. ओडिशामध्ये एका राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. या पेपरफुटीच्या विरोधात आणि तत्कालीन राज्य सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी त्यांनी तब्बल 1,500 विद्यार्थ्यांसह भुवनेश्वर येथील ओडिशा सचिवालयाबाहेर जोरदार आंदोलन केले होते.

( नक्की वाचा : NEET Protest: आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे संविधानात्मक हक्क )

आंदोलनात तुटली होती हाडे,  झाले होते जखमी

1997 मधील ते आंदोलन सुरुवातीला शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. मात्र, परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज केला होता. या पोलीस कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. यामध्ये विद्यार्थी नेते म्हणून पुढे असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनाही गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांच्या शरीराची काही हाडे फ्रॅक्चर झाली होती. त्या घटनेचे जुने फोटो आज नीट परीक्षेच्या गदारोळात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

2026 मधील नीट पेपरफुटी अन् 1997 ची आठवण

तब्बल 29 वर्षांनंतर काळाचे चक्र पूर्ण फिरले आहे. 2026 मधील नीट-युजी परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेवर (NTA) चौकशीची वेळ आली आहे. देशभरातील विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीसारख्या (CJP) राजकीय संघटना रस्त्यावर उतरून थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ज्या विषयासाठी एकेकाळी त्यांनी स्वतः रक्ताचे पाणी केले होते, आज त्याच विषयावरून त्यांच्यावरच राजीनाम्याचा दबाव आणला जात आहे.

( नक्की वाचा : देशभरात NEET वरून आंदोलन पेटलेलं असताना टॉपरने काय केलं? देशात दुसऱ्या आलेल्या पंशुलनं NDTV वर सांगितला मार्ग )

व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

1997 मधील आंदोलनाचे फोटो आज अचानक व्हायरल होण्यामागे एक मोठे राजकीय कारण आहे. 29 वर्षांपूर्वी पेपरफुटीविरोधात लढा देणारा एक विद्यार्थी नेता जेव्हा आज देशाचा शिक्षण मंत्री बनतो, तेव्हा यंत्रणेतील अशा गैरप्रकारांवर वेळीच अंकुश का लावता आला नाही, असा सवाल विरोधक आणि आंदोलक विचारत आहेत. 

एका बाजूला त्यांच्या जुन्या संघर्षाचे कौतुक केले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला आजच्या शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com