मध्य प्रदेशातील इंदूरमधून मुलांची संख्या वाढवणाऱ्या ब्राह्मण कुटुंबाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. परशुराम कल्याण मंडळाने ही मोठी घोषणा केली आहे. चार मुले असलेल्या प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे मंडळाने जाहीर केले. ब्राह्मण समाजात अधिकाधिक मुले जन्माला यावीत, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याची माहिती देखील मंडळाने दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. चार मुले जन्माला घालणाऱ्या ब्राह्मण समाजातील नवीन जोडप्यांना मंडळातर्फे एक लाख रुपये प्रोत्साहनपर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी किमान 4 मुले जन्माला घालावीत, अन्यथा इतर संपूर्ण देशाचा ताबा घेतील, असेही ते म्हणाले.
(नक्की वाचा- Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा)
तरुणांवर भावी पिढीच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. तरुण स्थिर होतात आणि एका अपत्यानंतर थांबतात. हे खूप भविष्यासाठी धोकादायक आहे. मी विनंती करतो. तुमच्याकडे किमान चार असले पाहिजेत," असंही विष्णू राजोरिया यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Exclusive Interviews : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा पुण्याlतील विद्यार्थ्यांना मनस्थाप; तरुणांनी रडून सांगितले अनुभव)
विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण परिचय परिषदेदरम्यान हे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजातील मुलांची संख्या वाढावी यासाठी जनजागृती मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजातील लोकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असे विधान केले होते.