जाहिरात

Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा

bhupendra vishwakarma linkedin post : भूपेंद्र विश्वकर्मा यांनी इन्फोसिस कंपनीतील वर्क कल्चर, कामाचा ताण, फायनान्शियल ग्रोथ अशा विविध अंगाने आपला अनुभव शेअर केला आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांनी हातात नोकरी नसताना देखील तडकाफडकी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं आहे. 

Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा

राहुल कुलकर्णी, पुणे

लार्सन अँड टुब्रो कंपनीचे (L&T) चेअरमन एसएन सुब्रमण्यम (SN Subrahmanyan) यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहिजे, असे मत मांडले आहे. त्यावर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. याआधी इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी देखील आठवड्यातील 70 तास काम करा, असा सल्ला दिला होता. या सर्व चर्चांदरम्यान इन्फोसिसचे माजी कर्मचारी भूपेंद्र विश्वकर्मा यांची LinkedIn पोस्ट व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

LinkedIn पोस्टमध्ये भूपेंद्र विश्वकर्मा यांनी इन्फोसिस कंपनीतील वर्क कल्चर, कामाचा ताण, फायनान्शियल ग्रोथ अशा विविध अंगाने आपला अनुभव शेअर केला आहे. यात भुपेंद्र यांनी कंपनीच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्यांनी हातात नोकरी नसताना देखील तडकाफडकी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं आहे. 

भुपेंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझ्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा असूनही मी कोणत्याही ऑफर लेटरशिवाय इन्फोसिसची नोकरी का सोडली. इन्फोसिसमध्ये असताना मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ज्याने शेवटी मला ऑफरशिवाय सोडण्याचा कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले. मला या आव्हानांबद्दल उघडपणे बोलायचे आहे, कारण ते कॉर्पोरेट कामाच्या ठिकाणी मोठ्या समस्यांचे सूचक आहेत.

Exclusive Interview 

पदोन्नती मिळायची मात्र पगारवाढ नाही

कंपनीत पदोन्नती दिली जात असे मात्र पगारवाढ मिळत नसे. आर्थिक वाढीशिवाय या पदोन्नतीला काहीच अर्थ नव्हता. टीम 50 वरून 30 पर्यंत कमी झाली तेव्हा अतिरिक्त कामाचा भार उर्वरित कर्मचाऱ्यांवर टाकला गेला. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याऐवजी मॅनेजमेंटने इतर टीमवर कामाचा भार टाकण्याचा सोपा मार्ग स्वीकारला, असा आरोप भुपेंद्र विश्वकर्मा यांनी केला आहे.

(नक्की वाचा-  घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)

दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य

तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषिक कर्मचाऱ्यांना वारंवार प्राधान्य दिले जात होते. तर आमच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून माझ्यासारख्या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांना दुर्लक्ष केले जात होते. हा उघड पक्षपातीपणा अन्यायकारक आणि नैराश्य आणणारा होता, असाही आरोपी भुपेंद्र विश्वकर्मा यांनी केला. 

(नक्की वाचा-  Accident News : मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायली निघाले, मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं)

भुपेंद्रची इन्फोसिस सोडण्याची कारणे?

आर्थिक प्रगतीचा अभाव, कामाच्या ताणाचे असमान वाटप,  करिअरच्या प्रगतीला मर्यादा, क्लायंटसह नकारात्मक वातावरण, कामाची योग्य दखल घेतली जात नसे, कामाच्या संधींमध्ये प्रादेशिक भेदभाव अशी कारणे भूपेंद्र विश्वकर्मा यांनी नोकरी सोडण्यासाठी दिली आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
इन्फोसिस कर्मचारी, Infosys
Listen to the latest songs, only on JioSaavn.com