अरविंद केजरीवालांचा बाहेर येताच भाजपवर निशाणा, उद्याचा कार्यक्रम जाहीर करत म्हटलं...

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे देखील आभार मानले. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अतंरिम जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार मानले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिहार तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केजरीवाल यांनी म्हटलं की, "मी सांगितलं होतं की लवकर येईन आणि आलो देखील. हनुमानाच्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्यासमोर आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांचा आशीर्वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे देखील मी आभार मानतो." यावेळी केजरीवाल यांनी 'भारत माता की जय'चे नारे देखील लगावले. 

अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटलं की, "आपल्या सर्वांना मिळून हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे आणि देशाला वाचवायचं आहे. मी प्रामाणिकपणे हुकूमशाहीविरोधात लढत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्या सर्वांना मिळून देशाला वाचवायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता मी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजत पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहे."

(नक्की वाचा- नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात)

अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर आप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. तिहार जेलबाहेर कार्यकर्त्यांनी मिठाई वाटत आपला आनंद साजरा केला. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं. 

Advertisement

केजरीवाल यांची 49 दिवसांनंतर सुटका

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. मागील 49 दिवसांपासून ते तुरुंगात होते. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे. पुढील 21 दिवस केजरीवाल बाहेर असणार आहेत. 

Advertisement