जाहिरात

जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर वरिंदर घुमनचा अचानक झाला मृत्यू! सलमान खानसह सुपरस्टार अभिनेत्रीसोबत केलंय काम

Body Builder Varinder Ghuman Death Reason : पंजाब फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. अभिनेता आणि बॉडी-बिल्डर वरिंदर सिंह घुमन यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर वरिंदर घुमनचा अचानक झाला मृत्यू! सलमान खानसह सुपरस्टार अभिनेत्रीसोबत केलंय काम
Body Building Varinder Singh Death
मुंबई:

Body Builder Varinder Ghuman Death Reason : पंजाब फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. अभिनेता आणि बॉडी-बिल्डर वरिंदर सिंह घुमन यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वरिंदर यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वरिंदर यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बायसेफला दुखापत झाल्याने किरकोळ ऑपरेशन करण्यासाठी वरिंदर अमृतसरच्या एका रुग्णालयात गेले होते. ते एकटेच घरातून निघाले होते, कारण हा मायनर ऑपरेशन होता. परंतु, वरिंदर यांना अचानक कार्डिएक अरेस्टचा झटका आला आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेंमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सलमानसोबत वरिंदरने केलंय काम

सलमान खानसोबत वरिंदरने 'टायगर 3'चित्रपटात काम केलं होतं. त्यांच्या बॉडी-बिल्डिंगचं अनेकांनी कौतुक केलं होतं.ज्या प्रकारची शरीरयष्टी वरिंदरने बनवली होती, त्या बॉडी-बिल्डिंगला पाहून सलमानचे चाहतेही थक्क झाले होते. हा चित्रपट वर्ष 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता.  वरिंदरने सलमान खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आला होता, तेव्हा वरिंदरने चाहत्यांमध्ये एक वेगळीचा छाप टाकली होती. वरिंदर प्रसिद्ध फिटनेस फ्रिक होते. वरिंदरने 2009 मध्ये मिस्टर इंडिया टायटल जिंकलं होतं. तसच मिस्टर एशिया चॅम्पियनशिपमध्ये वरिंदरने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांना द हिमॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जात होतं. वरिंदरला अभिनय करायलाही खूप आवडायचं. 

नक्की वाचा >> ग्राहकांनो! आता काय खरं नाय..सोनं तर सोडाच..चांदीचे भावही गगनाला भिडले, आजचे GOLD-SILVER रेट वाचून डोकंच धराल!

वरिंदर जगातील पहिला व्हेजिटेरियन प्रोफेशनल बॉडी बिल्डर होता. तेIFBB (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस) प्रो कार्ड जिंकणारे पहिले बॉडी बिल्डर होते. अमेरिकन अभिनेते आणि बॉडी बिल्डर आरनॉल्ड यांनी वरिंदरला आशियात त्यांच्या हेल्थ प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी हायर केलं होतं.वरिंदर त्यांच्या प्रोडक्ट्सचे ब्रॅण्ड एम्बेसेडर होते. 

वरिंदरला अभिनयाचंही होतं वेड

वरिंदर फक्त फिटनेस मध्येच नाही, अभियन करण्यातही माहिर होते.वरिंदरने काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. त्यांनी कबड्डी वन्स अपॉन या पंजाबी चित्रपटातही काम केलं. या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं.या चित्रपटाच्या माध्यमातून वरिंदरने फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलं होतं. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत वरिंदरने रोअर टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या चित्रपटाद्वारे डेब्यु केलं होतं. तसच मरजांवा चित्रपटातही वरिंदर झळकले होते. वरिंदरने बॉबी देओल, रितेश देशमुख,सिदार्थ मल्होत्रा,करिना कपूर खान आणि सलमान खानसोबत काम केलं आहे. 

नक्की वाचा >> पालघरमध्ये चाललंय तरी काय? आश्रमशाळेतील शौचालय साफ न करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांसोबत घडलं सर्वात भयंकर!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com