जाहिरात

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड, चांदीच्या तेजीमुळे मार्केटमध्ये उलथापालथ, आजचे भाव तर वाचा!

Today Gold And Silver Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालं.पण आताच्या घडीला चांदीचे दरही गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड, चांदीच्या तेजीमुळे मार्केटमध्ये उलथापालथ, आजचे भाव तर वाचा!
Gold And Silver Rate Today
मुंबई:

Today Gold And Silver Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालं.पण आताच्या घडीला चांदीचे दरही गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत दीड लाखांच्या पार गेली आहे. दसऱ्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीत 25 टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवल्याचं गुड्स रिटर्नसच्या रिपोर्टनुसार उघडकीस आलं होतं. दरम्यान, सोन्याच्या दरासोबतच आता चांदीच्या दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोनं महागल्याने ग्राहक चांदीला विकल्प मानत होते. पण आता चांदीही महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसेल, अशी चर्चा रंगली आहे. 

रिपोर्टनुसार, बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 1,22,600 रुपयांवर पोहोचली होती. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,14,000 रुपयांवर पोहोचले होते. तसच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95,600 रुपये तर 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79,700 रुपये होते. 

नक्की वाचा >> CJI BR Gavai सरन्यायाधीश भूषण गवईंचा AI व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलंय तरी काय?

तसच 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,21,600, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,12,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95,600, तर 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77,700 रुपयांवर पोहोचली होती. तसच चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे भाव 1,54,500 रुपये होते. तर प्लॅटिनमचे रेट 50000 रुपयांवर पोहोचले होते.

आज किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे भाव 

नागपूरच्या सराफा बाजारात आज गुरुवारी 9 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 1,23,300  रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 1,14,700  इतकी झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 96,200 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे विक्री दर 80,100 रुपये झाले आहेत.

नक्की वाचा >> भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, पाहा विमानाचा थरारक Video

दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,22,300 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,12,700, तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 94,200 रुपये झाले आहेत. 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे खरेदी दर 78,100 रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आज चांदीच्या दरात 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहेत. त्यामुळे चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे आजचे दर  1,65,500 रुपये झाले आहेत. तर प्लॅटिनमचे रेट 50000 रुपयांवर स्थिर आहे. 

आंतरराष्ट्रीूय स्तरावर चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याआधी चांदीचा फिफ्टी डॉलरचा रेकॉर्ड होता. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात तो विक्रम मोडला आहे. आंरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात असलेल्या चांदीचे भाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये आलेल्या तेजीमुळे मार्केटमध्ये उलथापालथ सुरु आहे. गुंतवणूकदारांसाठी हे एक चांगलं संकेत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com