केदारनाथ दर्शनासाठी सारा अली खानला 'हे' करावं लागेल; अ-हिंदुंच्या प्रवेशाबाबत काय आहेत नवे नियम?

Sara Ali Khan at Badrinath and Kedarnath : बद्री-केदार मंदिर समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sara Ali Khan at Badrinath and Kedarnath : बद्री-केदार मंदिर समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ आणि बद्रीनाथ धामसह राज्यातील इतर ४५ मंदिरांमध्ये अ-हिंदूंच्या (गैर-सनातनी) प्रवेशाबाबत मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आता या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी अ-हिंदू भाविकांना सनातन धर्मावर आपली श्रद्धा असल्याचे 'प्रतिज्ञापत्र' द्यावे लागणार आहे.

सारा अली खान हिला प्रतिज्ञापत्र देऊन दर्शन

बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केलं की, जर एखाद्या व्यक्तीची सनातन धर्मावर श्रद्धा असेल, तर ती व्यक्ती प्रतिज्ञापत्र देऊन दर्शन घेऊ शकते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची किंवा पार्श्वभूमीची असो. मंदिर समितीच्या पत्रकार परिषदेवेळी सारा अली खान हिचा उल्लेख करण्यात आला. सारा अली खान वारंवार केदारनाथला दर्शनासाठी जात असते. जर सारा अली खान सारख्या व्यक्तीला दर्शन घ्यायचं असेल, तर त्यांनाही सनातन धर्मात आस्था असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल, त्यानंतरच त्यांना प्रवेश मिळेल.

Advertisement

नक्की वाचा - Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला

उत्तराखंडमध्ये चर्चांना उधाण

भाविकांच्या सोयीसाठी हे प्रतिज्ञापत्र मंदिर परिसरातच उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तिथेच आपली श्रद्धा सिद्ध करता येईल. धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय आगामी चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यावरून आता उत्तराखंडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.