- बद्रीनाथ और केदारनाथ धाम में गैर–सनातनी के प्रवेश के लिए सनातन धर्म में आस्था का शपथ पत्र अनिवार्य होगा.
- मंदिर समिति अध्यक्ष ने कहा कि आस्था की लिखित घोषणा देने वाले श्रद्धालु धाम में दर्शन कर सकते हैं.
- मंदिर समिति शपथ पत्र का प्रारूप मंदिर परिसर में उपलब्ध कराएगी जिससे श्रद्धालु वहीं पर इसे भर सकेंगे.
Sara Ali Khan at Badrinath and Kedarnath : बद्री-केदार मंदिर समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ आणि बद्रीनाथ धामसह राज्यातील इतर ४५ मंदिरांमध्ये अ-हिंदूंच्या (गैर-सनातनी) प्रवेशाबाबत मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आता या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी अ-हिंदू भाविकांना सनातन धर्मावर आपली श्रद्धा असल्याचे 'प्रतिज्ञापत्र' द्यावे लागणार आहे.
सारा अली खान हिला प्रतिज्ञापत्र देऊन दर्शन
बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केलं की, जर एखाद्या व्यक्तीची सनातन धर्मावर श्रद्धा असेल, तर ती व्यक्ती प्रतिज्ञापत्र देऊन दर्शन घेऊ शकते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची किंवा पार्श्वभूमीची असो. मंदिर समितीच्या पत्रकार परिषदेवेळी सारा अली खान हिचा उल्लेख करण्यात आला. सारा अली खान वारंवार केदारनाथला दर्शनासाठी जात असते. जर सारा अली खान सारख्या व्यक्तीला दर्शन घ्यायचं असेल, तर त्यांनाही सनातन धर्मात आस्था असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल, त्यानंतरच त्यांना प्रवेश मिळेल.
उत्तराखंडमध्ये चर्चांना उधाण
भाविकांच्या सोयीसाठी हे प्रतिज्ञापत्र मंदिर परिसरातच उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तिथेच आपली श्रद्धा सिद्ध करता येईल. धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय आगामी चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यावरून आता उत्तराखंडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world