
अहमदाबाद: अदाणी समूहाने भारतातील पुरुषांच्या व्यावसायिक गोल्फची अधिकृत मान्यता देणारी संस्था प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) सोबत भागीदारी करुन 'अदानी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप 2025' लाँच केले आहे. यासोबतच अदानी ग्रुप भारतातील व्यावसायिक गोल्फमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. 1.5 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह ही पहिलीच स्पर्धा 1 ते 4 एप्रिल दरम्यान ग्रेटर नोएडा येथील जेपी ग्रीन्स गोल्फ अँड स्पा रिसॉर्ट येथे आयोजित केली जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही भागीदारी अहमदाबाद येथील बेल्वेडेअर गोल्फ अँड कंट्री क्लब येथे अदानी-पीजीटीआय संयुक्त गोल्फ प्रशिक्षण अकादमीच्या स्थापनेपर्यंत विस्तारित आहे. अदानी समूहाच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट गोल्फचा प्रचार आणि विस्तार करणे आणि त्याला मुख्य प्रवाहातील खेळ म्हणून स्थापित करणे, तसेच भारतातील जागतिक विजेत्यांची पुढील पिढी तयार करणे आहे आहे. तसेच या उपक्रमामुळे अदाणी समूहाचा शेवटच्या घटकापर्यंत विकास करण्याचा संकल्प आणि 2026 ला भारतामध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला पाठिंबा दर्शवला आहे.
याबाबत अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी म्हणाले, 'भारतीय व्यावसायिक गोल्फच्या विकासात योगदान देण्यासाठी कपिल देवजी आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) सोबत हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. भारताला गोल्फमध्ये जगजेत्ता बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही गोल्फची उपलब्धता वाढवण्यासाठी, अधिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि खेळाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत.
(नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव यांनी अदानी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप २०२५ च्या लाँचसह भारतातील व्यावसायिक गोल्फला पाठिंबा दिल्याबद्दल अदाणी समूहाचे आभार मानले. 'जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या अदाणी ग्रुपच्या पाठिंब्यामुळे पीजीटीआयला भारतातील अधिक चॅम्पियन गोल्फ खेळाडू निर्माण करण्यास मदत होईल जे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावतील. मला आशा आहे की गोल्फ चाहते स्पर्धेदरम्यान त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मोठ्या संख्येने फॉलो करतील, असं ते म्हणाले.
अदाणी समूह कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या सहकार्याने 'अदाणी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप 2025' च्या लॉन्चसह भारतीय व्यावसायिक गोल्फमध्ये पदार्पण करत आहे.#adanigroup #Golf #ndtvmarathi pic.twitter.com/6W5h2sECv2
— NDTV Marathi (@NDTVMarathi) March 19, 2025
अदाणी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप 2025 ला पीजीटीआयसाठी एक महत्त्वाचा क्षण असल्याचे पीजीटीआयचे सीईओ अमनदीप जोहल म्हणाले. "या संघटनेमुळे टूरची प्रतिष्ठा वाढेल. भारतीय व्यावसायिकांसाठी अधिक खेळण्याच्या संधी निर्माण करण्याच्या पीजीटीआयच्या दृष्टिकोनाचे आम्ही आमच्या शीर्षक प्रायोजक अदाणी ग्रुपचे आभार मानतो. आकर्षक बक्षीस रक्कम, जेपी ग्रीन्स गोल्फ अँड स्पा रिसॉर्टमधील उत्कृष्ट खेळण्याच्या परिस्थिती आणि विजेतेपदासाठी स्पर्धा करणारे उच्च दर्जाचे मैदान यामुळे, उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या अदानी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप 2025 मध्ये गोल्फ खेळण्याचा एक शानदार आठवडा पाहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी दिले.
(नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?)
दरम्यान, 29 मार्च रोजी अहमदाबादमधील बेल्वेडेअर गोल्फ अँड कंट्री क्लबमध्ये एक प्री-टूर्नामेंट कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमासोबत, पाच आघाडीचे पीजीटीआय व्यावसायिक अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील 50 मुलांना गोल्फ खेळाची ओळख करून देण्यासाठी एक गोल्फ क्लिनिक आयोजित करतील
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world