
Nagpur Violence : ऐरवी शांतपणे जगणाऱ्या नागपुरकरांसाठी 17 मार्चची रात्र एक वादळ घेऊन आली. नागपुरात झालेल्या दंगलीच झळ राज्यभरात पसरली. गेल्या अनेक दिवसांपासून काही धार्मिक संघटना आणि नेतेमंडळींकडून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे. यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारलं आहे. रविवारी-सोमवारीही अनेक संघटनांनी रस्त्यावर औरंगजेबाचे फोटो जाळले. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सोमवारी नागपुरात जे काही घडलं त्यामुळे सर्वसामान्य भीतीच्या छायेत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसरीकडे भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता 80-100 लोकांचा जमाव जमला होता. तिथे जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर आणि सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागपूरच्या हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप केला जात आहे. नागपूर पोलिसांनी वेळीत संघटनांना सावरलं असतं तर दंगलीची परिस्थिती उद्भवली नसती असं अनेकांकडून म्हटलं जात आहे. कोणत्याही धार्मिक संघटनांच्या आंदोलनासाठी काही नियमावली असतात. मात्र नागपूर पोलिसांकडून त्याचं पालन करण्यात आलं नसल्याचा आरोप केला जात नाही.
नक्की वाचा - Nagpur News: नागपुरात झालेल्या राड्यानंतर सकाळची स्थिती काय? 80 जणांना घेतलं ताब्यात
नागपूर पोलिसांच्या 4 चुका
- अशा प्रकारच्या धार्मिक आंदोलनं किंवा मोर्चांना परवानगी देताना अटीशर्ती घालून आयोजकांना परवानगी दिली जाते. पण बजरंग दलाने आयोजित केलेल्या मोर्चाला अटीशर्तीविना परवानगी का दिली?
- मोर्चेकरी किंवा आंदोलकांच्या कृतीमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मोर्चाच्या आधीच प्रतिकात्मक पुतळे किंवा धार्मिक श्रद्धेशी संबंधित साहित्य जप्त केलं जातं. मग या आंदोलनात धार्मिक श्रद्धेशी संबंधित वस्तु का जप्त केल्या गेल्या नाहीत?
- नागपुरात एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या उपलब्ध असताना पोलिसांनी त्यांची मदत का घेतली नाही?
- वातावरणात तणाव असतानाही पोलिसांनी कोणतीही पूर्वतयारी न करता दंगेखोरांना सामोरं जाण्याची चूक का केली?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world