Women Empowerment : महिलेने घरातूनच सुरू केला RO वॉटरचा व्यवसाय, महिन्याला मिळतेय 19 हजार रुपयांचे उत्पन्न

Adani Foundation : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे, त्यांच्यासाठी उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण व्हावे यासाठी एसीसी आणि अदाणी फाऊंडेशन यांनी संयुक्तरित्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

महिला सक्षम व्हाव्यात त्या आपल्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांसोबतच विविध सामाजिक संस्थाही यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. या उपक्रमांमुळे आश्चर्यकारक बदल घडताना दिसत आहे. एसीसी आणि अदाणी फाऊंडेशनने मिळून उत्तर प्रदेशातील 'टिकारिया'तील महिलांना सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  महिला सक्षम झाल्या तर केवळ त्याच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. हे ओळखूनच अदाणी फाऊंडेशन आणि एसीसीने महिलांना उत्पन्नाचे शाश्वत मार्ग शोधण्यास मदत केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एसीसी आणि अदाणी फाऊंडेशनने महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. यातून गरिमा तिवारी यांना अदाणी फाऊंडेशनतर्फे 60 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. याशिवाय त्यांना प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनही देण्यात आले. यातून गरिमा तिवारी यांनी विविध माध्यमातून 5.5 लाखांचे कर्ज उभे केले. या रकमेतून गरिमा तिवारी यांनी घरामध्ये रिव्हर्स ओस्मॉसिस प्लँट (RO Water Plant) सुरू करण्याचा निर्णय घेतला. गरिमा आता आर.ओ.वॉटरचा पुरवठा करत असून यातून त्यांना महिन्याला 19 हजार रुपयांचे उत्पन्न मिळायला लागले आहे. यामुळे गरिमा तिवारी यांच्या कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचा एक शाश्वत मार्ग सापडला आहे. 

नक्की वाचा - Adani Enterprises ला 'बाय' रेटींग, वेंचुरा सिक्युरेटीजनं दिला सल्ला

महिला बचत गटांमुळे सकारात्मक आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यास किती मदत होते हे या उदाहरणावरून स्पष्ट होण्यास मदत होते. अदाणी फाऊंडेशनने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सातत्याने मदत केली आहे. एसीसी आणि अदानी फाउंडेशन ग्रामीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी, सर्वसमावेशक वाढीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भारतामध्ये शाश्वत आर्थिक संधी निर्माण करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.