जाहिरात

अदाणी ग्रुपने रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी लाँच केले नवे कॅम्पेन, गौतम अदाणी म्हणाले - हम करके दिखाते हैं!

अदाणी ग्रुप रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर काम करत आहे. वर्ष 2030पर्यंत या प्लांटद्वारे 50 गीगाव्हॅटची रिन्युएबल एनर्जी विकसित करण्याचे अदाणी ग्रुपच्या रिन्युएबल युनिट अदाणी ग्रीनचे लक्ष्य आहे.

अदाणी ग्रुपने रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी लाँच केले नवे कॅम्पेन, गौतम अदाणी म्हणाले - हम करके दिखाते हैं!

Hum Karke Dikhate Hain Campaign :  अदाणी ग्रुपद्वारे रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी गुरुवारी (19 डिसेंबर) नवीन अ‍ॅड कॅम्पेन लाँच करण्यात आले. 'पहले पंखा आएगा, फिर बिजली आएगी' ('आधी पंखा येईल, मग वीज येणार') अशी पंचलाइन जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी कॅम्पेनचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलंय की, "आमची आश्वासने केवळ पायाभूत सुविधांबाबत नसून लाखो लोकांच्या आशा, प्रगती आणि त्यांचे उज्ज्वल भविष्याकरिताही आहेत. हम करके दिखाते हैं."

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"आधी पंखा येईल, मग वीज येईल"

अदाणी ग्रुपनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कॅम्पेनचा व्हिडीओ शेअर केला आहे. देशातील दुर्गम ठिकाणी असलेल्या एका गावामध्ये वीज नसल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. यामध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांना वीज कधी येणार आणि पंखा कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारतो. यावर त्याचे बाबा उत्तर देतात की, "आधी पंखा येईल, मग वीज येणार". यानंतर हा चिमुकला सर्वांना तेच सांगत फिरतो की 'आधी पंखा येईल, मग वीज येणार'. पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याची खिल्लीही उडवतात. अखेर मुलाच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट गावकऱ्यांना सत्यात पाहायला मिळते. म्हणजेच अदाणी ग्रुप पवनचक्कीच्या माध्यमातून गावामध्ये वीजपुरवठा करत असल्याचे व्हिडीओच्या शेवटी दाखवण्यात आले आहे. पर्यावरणातून वीज निर्मितीसह लोकांच्या जीवनात आनंदही पसरवतो, अस संदेशही अदाणी ग्रुपने या व्हिडीओद्वारे दिलाय.

2030पर्यंत 50 गीगाव्हॅटची रिन्युएबल एनर्जी क्षमता विकसित करण्याचे टार्गेट 

अदाणी ग्रुप रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर काम करत आहे. वर्ष 2030पर्यंत 50 गीगाव्हॅटची रिन्युएबल एनर्जी विकसित करण्याचे अदाणी ग्रुपच्या रिन्युएबल युनिट अदाणी ग्रीनचे टार्गेट आहे. कंपनी गुजरातमधील खावडा येथे एक ग्रीन एनर्जी पार्क देखील विकसित करत आहे. खावडा रिन्युएबल एनर्जी प्लांट 538 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलंय आणि ही जागा पॅरिस शहरापेक्षा पाचपटीने मोठी आहे. या संयंत्राची एकूण क्षमता 30 गीगाव्हॅट असेल,  2029पर्यंत हे प्लांट विकसित करण्याचे कंपनीचे टार्गेट आहे. खावडा रिन्युएबल एनर्जी पार्कमध्ये नुकतेच 250 मेगाव्हॅट क्षमतेचा पहिला पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.  

2016मध्ये  तमिळनाडू येथे 648 मेगाव्हॅटचा कामुथी सोलर प्लांट पूर्ण

वर्ष 2016मध्ये कंपनीने तमिळनाडू येथे 648 मेगाव्हॅटच्या कामुथी सोलर प्लांटचे काम पूर्ण केले आणि त्यावेळेस हा जगातील सर्वात मोठा सिंगल साइट सौर ऊर्जा प्रकल्प होता, असे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे (AAHL) संचालक जीत अदाणी यांनी अलिकडेच सांगितले होते.   

"आम्ही आज गुजरातमधील खावडा येथे आणखी एक रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारत आहोत, कामुथी प्रकल्प मोठा होता असे तुम्हाला वाटत असेल, तर खावडा अति विशाल प्रकल्प आहे, असे म्हणावे लागेल. खावडा रिन्युएबल एनर्जी पार्क पॅरिस शहराच्या आकाराच्या पाचपट अधिक मोठा आहे. या प्रकल्पाचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा याद्वारे 30 गीगाव्हॅट स्वच्छ ऊर्जा निर्माण केली जाईल", असेही जीत अदाणी यांनी सांगितले.

(Disclaimer: New Delhi Television is a subsidiary of AMG Media Networks Limited, an Adani Group Company.)