अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोमवारी अदाणी इंटरनॅशनल शाळेतील (Adani International School) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते यावेळी म्हणाले की, यश कधीच वैयक्तिक नसतं. तुम्ही संपूर्ण जगाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर यश आहे. स्वत:च्या यशासह तुम्ही जगासाठीही काम करा. आपलं जग वेगाने पुढं जातंय. माझा विश्वास आहे, की शिक्षक केवळ परीक्षेसाठी तयारी करत नाहीत तर ते तुमच्या जीवनाचीही तयारी करून घेत असतात.
अदाणी इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांना गौतम अदाणींचा संदेश...
गौतम अदाणी म्हणाले की, जेव्हा मी आपल्या करियरची सुरुवात केली, तेव्हा माझ्याजवळ कोणताच स्त्रोत, रोडमॅप, कनेक्शन नव्हतं. माझ्याकडे केवळ स्वप्न होतं, काहीतरी अर्थपूर्ण करण्याचं स्वप्न. असं काही ज्यातून माझा आत्मविश्वास दुणावेल. मी दररोज हेच स्वप्न पाहायचो.
-पालकत्व म्हणजे केवळ मुलांचं भविष्य घडवणं नसून त्यांना भारताचं भविष्य सुधारण्यासाठी प्रेरणा देणे देखील आहे.
- इथं उपस्थित एज्युकेटर्स ड्रीम क्रिएटर्स आहेत. त्यांना माझा एक सल्ला आहे. तुम्ही जे शिकवाल, तुम्ही उच्चारलेला प्रत्येक प्रेरणा वाढविणारा शब्द मुलांच्या जीवनाला आकार देतो. सद्याच्या धावपळीच्या जगात तुमची भूमिका आधीपेक्षा वाढली आहे.
- आमच्या शाळेवर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. या तरुणांच्या विचारांना आकार देण्यापेक्षा कोणतीही जबाबदारी मोठी असू शकत नाही, कारण हीच मुलं उद्याच्या भारताचं भवितव्य आहेत.
पालकत्व म्हणजे केवळ मुलांचं भविष्य घडवणं नसतं...
गौतम अदाणी पुढे म्हणाले, गौतम अदाणी म्हणाले की, जेव्हा मी आपल्या करियरची सुरुवात केली, तेव्हा माझ्याजवळ कोणताच स्त्रोत, रोडमॅप, कनेक्शन नव्हतं. माझ्याकडे केवळ स्वप्न होतं, काहीतरी अर्थपूर्ण करण्याचं स्वप्न. असं काही ज्यातून माझा आत्मविश्वास दुणावेल. मी दररोज हेच स्वप्न पाहायचो. पालकत्व म्हणजे केवल मुलांच्या भवितव्याला आकार देणं नसतं. तर त्यांना देशाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करण्यास प्रेरणा देणं असतं.
गौतम अदाणींनी अदाणी शाळेच्या शिक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, तुम्ही या संस्थेचे हिरो आहात. तुमच्या हाताने ही पिढी तयार होत आहे. कदाचित तुमचे प्रयत्न लगेचच दिसणार नाही, मात्र तुम्ही जे बी पेरताच त्याचा मोठा फायदा होईल. माझा तुम्हाला सलाम.