अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाने (SVPI) जागतिक स्तरावर आपले नाणे खणखणीतपणे वाजवले आहे. ब्रिटनच्या 'ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल'ने (BSC) या विमानतळाला आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 5-स्टार मानांकन दिले आहे. विशेष म्हणजे, हे मानांकन मिळवणारे हे 2025 मधील भारत आणि आशियातील एकमेव विमानतळ आहे. या कामगिरीमुळे ते जगातील निवडक उत्कृष्ट विमानतळांच्या यादीत सामील झाले आहे.
कठोर ऑडिट प्रक्रिया
हे मानांकन मिळवण्यासाठी अत्यंत कठोर ऑडिट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेमध्ये 4,500 पेक्षा जास्त जागतिक मानकांची कसोटी लावण्यात आली होती. 'ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल'ने दिलेल्या फाईव्ह स्टार रेटींगमुळे विमानतळावर प्रत्येक स्तरावर प्रवाशांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षिततेचे उत्तम वातावरण तयार करण्यात आले आहे याची पोचपावती मिळाली आहे. या यशामागे अनेक नव्या उपक्रमांचा मोठा हातभार लागला आहे. 'अविओ' (aviio) ॲपद्वारे 'डिजिटल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स' (SOP) वापरल्या जात आहेत, ज्यामुळे कामांमध्ये सुधारणा करणे सोपे झाले आहे. तसेच, सुरक्षा आणि प्रकल्पांच्या देखरेखीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
नक्की वाचा: 'सत्यमेव जयते'... गौतम अदाणी यांचे अदाणी समूहाच्या शेअरहोल्डर्सना पत्र
एकही लॉस्ट टाइम इंज्युरी नाही
विमानतळाने 'झीरो हार्म' (Zero Harm) हे उद्दिष्ट ठेवले आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले असून, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी 'लाइफ सेफ्टी सिस्टम रिक्वायरमेंट्स' (LSSR) ट्यूटोरियल व्हिडिओ आणि एक विशेष प्रशिक्षण पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विमानतळाने आतापर्यंत सुरक्षितपणे दीड कोटी मानवी तास पूर्ण केले आहेत. यात एकही 'लॉस्ट टाइम इंज्युरी' (LTI) झालेली नाही.
नक्की वाचा: सर्वात मोठा सायबर हल्ला; टाटा मोटर्सचं हजारो कोटींचं नुकसान, कर्मचाऱ्यांचा डेटाही उडाला
यासोबतच, टर्मिनलमध्ये स्वच्छता राखण्यासाठी 24 इंटेलिजेंट क्लीनिंग रोबोट्स वापरले जात आहेत. 'ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल'ने दिलेले हे 5-स्टार मानांकन हे एसव्हीपीआय विमानतळाच्या सुरक्षिततेला दिलेल्या सर्वोच्च प्राधान्याचा पुरावा ठरले आहे. हे विमानतळ ' अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड' (AAHL) द्वारे चालवले जाते, जी ' अदाणी एंटरप्रायझेस'ची उपकंपनी आहे. ही कंपनी भारतातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतील सर्वात मोठी विमानतळ ऑपरेटर आहे. 987 एकर परिसरात पसरलेले हे विमानतळ गेल्या 80 वर्षांपासून सेवा देत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या विमानतळाने 1.33 कोटी प्रवाशांची वाहतूक केली असून इथे दररोज 280 विमान सेवा हाताळल्या जातात.